कराडात "मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर" या अभियानास प्रारंभ...
कराडात "मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर" या अभियानास प्रारंभ...
कराड दि.19- (प्रतिनिधी) केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय (MOHUA) आदेश नुसार कराड नगर परिषदे मार्फत "मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर" हे अभियान सूरू करण्यात आले आहे. पूढील तीन आठवड्यांच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. कराड नगरपरिषदे कडून "रिड्यूस, रियुज आणि रिसायकल" सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रे पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात 15 ठिकाणी स्थापन केली असल्याची माहिती आरोग्य अभियंता आर डी भालदार यांनी दिली.
शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लॅस्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी "रिड्यूस, रियुज आणि रिसायकल" सेंटर्स म्हणजेच RRR सेंटर्स येथे जमा करावीत जेणेकरून संकलित कलेल्या वस्तू नुतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादन तयार करण्यासाठी उपयोगी ठरतील अशी माहिती ही आरोग्य अभियंता भालदार यांनी दिली. नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.
कुणाकडे खूप कपडे व अन्य दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत, तर कुणाकडे यापैकी काहीच नाही. समाजात ही दरी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. हीच दरी कमी करण्यासाठी मोठा आधार ठरणारी आणि गेल्या काही वर्षापासून सर्वत्र चर्चेत असलेली ‘माणुसकीची भिंत’ आता पून्हा एखदा या अभियानाच्या माध्यमातुन कराडमध्ये उभारली गेल्याने गरजूंना मदत मिळू शकणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत कराड नगरपरिषदेने या उपक्रमासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.
"मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर" RRR Center या अभियाना अंतर्गत कराड शहरवासीयांना आव्हान करण्यात आले आहे. ज्यामध्ये आपल्या जवळ किंवा घरामध्ये असलेल्या जुन्या वस्तू, जुनी भांडी, जुनी पुस्तके, कपडे, जुने चप्पल-जुते, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. वापरण्या योग्य वस्तू कराड नगरपरिषद येथे RRR centre.(Reduce, Reuse, Recycle) सेंटरला जमा करुन कराड शहर वासियांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यास मदत व जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करून आणि गरजूंना उपयोगात देवूया असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
माणुसकीची भिंत’ ही संकल्पना आता सर्वत्रच लोकप्रिय झाली आहे. ‘नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा’, यावर आधारलेली ही भिंत गरीब, मध्यमवर्गीय, सर्वांसाठीच आकर्षक ठरली आहे. नगरपरिषदेच्या वतीने शहरात पंधरा ठिकाणी ही भिंत उभारण्यात आली आहे. यापूर्वीही कराडात विविध भिंतीवर याची रचना करण्यात आली होती. तर आता पून्हा एखदा शहरा बरोबर लगतच्या भागात ही माणुसकीची भिंत सजविण्यात आली आहे. इतर साहित्य, पुरुषांचे साहित्य, महिलांचे साहित्य, लहान मुलांचे साहित्य अशा विभागांमध्ये साहित्य ठेवावे, अशा सूचना यामध्ये करण्यात आल्या आहेत. ‘एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा’, असे आवाहन याद्वारे नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे...पूढे वाचा...




Comments
Post a Comment