पून्हा एखदा नोटबंदी;दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार...
पून्हा एखदा नोटबंदी;दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार...
दिल्ली दि.19-दोन हजार रुपयांची नोट आता चलनातून बंद होणार आहे. आरबीआयने याबाबत निर्णय घेतला असून 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा चालणार आहेत. या दरम्यान नागरिकांना नोटा बदलून घ्याव्या लागतील.जसे 2016 मध्ये नोटबंदी नंतर शंभर,पाचशे,हजार रूपयांचा नोटा बंद करून त्या बदलून देण्यात आल्या होत्या.त्यावेळी देशभरात हाहाकार माजला होता.
आज रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला असून बाजारातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वापरता येणार असल्याचे RBI ने म्हटले आहे. 2018-19 मध्येच या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.आता दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हंटले आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. दरम्यान ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून आता नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.
एका वेळी नागरिकांना किती नोटा बदलता येणार...
एका वेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष दालन उघडावे लागणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.
30 सप्टेंबरनंतरही 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील. RBI ला अपेक्षा आहे की नागरिकांनी बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे. चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या बहुतांश नोटा 30 सप्टेंबरच्या दिलेल्या मुदतीत बँकांमध्ये परत येतील. हा RBI चा नियमित कार्यप्रणाली चा भाग आहे आणि नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.



Comments
Post a Comment