कराड नगरपरिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली तर माजी मुख्याध्याधिकारी औंधकर ही चर्चेत......
कराडचे मुख्याधिकारी चर्चित... सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली... माजी मुख्याधिकारी लाच लुचपत खात्याच्या जाळ्यात.. कराडात चर्चेला उधाण...
कराड दि.16-(प्रतिनिधी) कराडकरांसाठी आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्याचे दिसून आले. कराड नगर परिषदेमध्ये 2015 ते 17 या दरम्यान मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले तत्कालिन मुख्याधिकारी विनायका औॅधकर हे आज सायंकाळी विटा येथे लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात अडकल्याची बातमी कराडला येऊन धडकली तर कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली झाल्याची ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे कराडकेंद्रित व कराड संबंधित असलेल्या या दोन मुख्याधिकाऱ्यांच्या बातमीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. वास्ताविक दोन वेगवेगळ्या घटना आज योगायोगाने घडून गेल्या.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कराडला 2015 ते 2017 दरम्यान मुख्याधिकारी म्हणून विनायक औंधकर यांनी कार्यभार सांभाळला होता. मंडईतील अतिक्रमण व कार्यालयिन सिस्त लावणारे औंधकर त्यांच्या शेवटचा काही काळ्त वादग्रस्त ठरले. त्यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलने केले.आंदोलन बराच काळ चालले.शेवठी त्यांच्या बदलीच्या प्रसंगीही नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यांची या ठिकाणाहून बदली झालीच. तेही थेट महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी. त्यानंतर हा विषय कराडात चर्चेचा ठरला व तो आजही कायम आहे. औंधकर यांना शहरातील ठराविक नगरसेवकांचा विरोध होता. ते कामाचे पक्के व रोखठोक होते. त्यांनी सिस्त ही लावली होती.पण काही नगरसेवकांना ही सिस्त रूचली नव्हती.
दरम्यान गत अडीच महिन्यापूर्वी कोल्हापूरहून विनायक औंधकर यांची बदली सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातल्या विटा नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून झाली. अन आज सायंकाळी मुख्याधिकारी विनायक औंधकर हे दोन लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकल्याची बातमी कराडकरांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे कराडकेंद्रित या काही गोष्टी खमंग चर्चेने चर्चिले जाऊ लागल्या. त्यामुळे पुन्हा काही जुन्या आठवणींना उजाळा मिळू लागला. कराडला ही औंधकर असताना आॅफिसमधील टिव्हीसह अन्य गोष्टींसह त्यांच्या कडक सिस्तीची चर्चा होत होती.
विनायक औंधकरांची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि कराडला सध्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली झाल्याच्या आदेश सायंकाळी उशिरा त्यांच्याकडे प्राप्त झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे कराडकेंद्रित दोन्हीही मुख्याधिकाऱ्यांच्या या दोन वेगवेगळ्या बातम्यांमध्ये सोशल मीडियावर कराडकरांचे चांगलेच मनोरंजन केले. पण डाकेंच्या बदलीचा ही आदेश आजच काढला गेल्याने हा ही विषय चर्चेचा ठरला.
कराड नगरपरिषद आणि कराड नगरपरिषदेत येणारा मुख्याधिकारी गेल्या काही वर्षात चर्चेचा विषय ठरलेला आहे. हा चर्चेचा विषय विनायक औंधकरांच्या पासून सुरू झाला. विनायक औंधकर यांच्यानंतर यशवंत डांगे कराडला आले. ज्या वेळेला डांगे आले त्या वेळेलाही औंधकर-डांगे, आदेश, चार्ज हा ही विषय गमतीशीर व चर्चेचा झाला होता. डांगेनी त्यांच्या पध्दतीने काम करीत कराडला सलग स्वच्छ सर्वेक्षणात देशात अव्वल पोहचवले. त्यांनी अनेक निर्णय बेधडक घेतले जे कूणी ही याअधी घेतले नव्हते. त्यानंतर यशवंत डांगे यांची बदली झाली. त्यावेळीही डांगे यांच्या जागी डाके आले आणि तसाच प्रकार पुन्हा एकदा झाला. यावेळीही चार्ज घेणे देणे, बदली झाली, नाही झाली या मध्ये चार्ज अन्य मुख्याधिकारी कडे असा काहीसा प्रकार कराड नगरपरिषदेत घडला होता. त्या घटनेची आजही या दोन्ही घटनेमुळे आठवणी ताज्या झाल्या.


Comments
Post a Comment