मलकापूर ढेबेवाडी फाटा परिसरातील अनेक कामे मार्गी;प्रशासन, कंपनी अधिकार्‍यांकडून कामांची पाहणी, दादा शिंगण यांच्या पाठपूराव्याला यश...

 


मलकापूर ढेबेवाडी फाटा परिसरातील अनेक कामे मार्गी;प्रशासन, कंपनी अधिकार्‍यांकडून कामांची पाहणी, दादा शिंगण यांच्या पाठपूराव्याला यश...

कराड दि.19-(प्रतिनिधी) कराड तालुका मनसेचे अध्यक्ष दादा शिंगण यांच्या विविध मागण्यांची दखल घेऊन प्रशासन व कंपनीच्यावतीने विविध समस्या दूर केल्या आहेत.या झालेल्या कामांची आज सबंधित अधिकारी, नगरपरिषद अधिकारी, वाहतूक अधिकारी यांनी पाहणी केली. मलकापूर येथील रहिवाशांना महामार्गाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी, रोज होणारे अपघात व अन्य अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या अडचणी दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मलकापूर, ढेबेवाडी फाटा येथे होणारी वाहतुक कोंडी व पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणारे पाणी, गटर दूरूस्ती तात्काळ करुन अन्य कामांची दखल घेऊन प्रशासन, महामार्ग तसेच ठेकेदार कंपनीकडून संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी पूढाकार घेतला आहे. ढेबेवाडी फाटा येथे दोन्ही बाजूला नवीन रस्ते केल्याने वाहतुक कोंडी कमी झाली आहे. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी गटर साफसफाई सूरू केली आहे.

सध्या महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी वाहतूक कोंडी व अपघात यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच पावसाच्या पाण्यामुळे रहिवाशांच्या घरे, दुकाने यांचे नुकसान याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष दादा सिंगण यांनी संबंधित प्रशासनाकडे सदर समस्या दूर करण्यासाठी गत आठवड्यात पाठपूरावा केला होता. या पाठपूराव्यामुळे सदर समस्या दूर करण्यात येत असल्याचे प्रशासन तसेच कंपनीच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.

दादा शिंगण यांनी सूचवलेल्या कामांची,समस्यांची प्रशासनाने तात्काळ दखल घेत बैठकीत ठरल्याप्रमाणे महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गटरची दुरुस्ती बरोबर गटार वर झाकणे बसवली. खंडोबानगर, व्यंकटेशनगर, लाहोटीनगर व नटराज थिएटर तसेच कोल्हापूर नाका या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचणार नाही याबाबत उपाययोजना सूरू करुन ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवले व वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे नियोजन केले आहे...पूढे वाचा...

या वेळी महामार्ग तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्या समवेत मलकापूरचे मुख्याधिकारी यांचेवतीने बांधकाम विभागाचे रामभाऊ शिंदे,कराड वाहतूक नियंत्रण अधिकारी दीपक जाधव व कर्मचारी, डी पी जैन कंपनीचे अधिकारी, जिनिअर सौरभ गौस, अजित विश्वास व अशोककूमार तिवारी उपस्थित होते.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक