सातारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मेळावा....
सातार्यात 21 व 22 मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन....
सातारा दि.18: जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक 21 व 22 मे 2023 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यशोदा टेक्नीकल कॅम्पस, वाढे सातारा येथे होणाऱ्या या रोजगार मेळाव्यात बीपीओ, केपीओ, बँकींग एनजीओज, हॉटेल, फायनान्स, आयटी, रिटेल, एज्युकेशन, हॉस्पीटल, हॉस्पीटॅलिटी, रिअल इस्टेट, हेल्थ केअर, मॅनेजमेंट, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इन्शुरन्स आणि सिक्युरिटी अशा क्षेत्रातील 100 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये युवक युवतींना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत...पूढे वाचा...
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी http://www.satarajobfair2023.in या लिंकवरुन नोंदणी करावी. उमेदवारांनी सकाळी 9 वाजेपर्यंत मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे. सोबत 2 फोटो व बायोडाटाच्या किमान 5 प्रती आणाव्यात. या मेळाव्यामध्ये किमान 10 हजार उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याचे उद्दीष्ट आहे. अधिक माहितीसाठी 02162-244655 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन उमेशचंद्र दंडगव्हाळ, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.


Comments
Post a Comment