हेळगाव-पाडळी येथे महिलेसह दोन मूलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू...
कराड-येथिल काॅटेज हाॅस्पिटलमध्ये अनेक महिलांना शोक व्यक्त केला....
हेळगाव-पाडळी येथे महिलेसह दोन मूलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू...
कराड दि.16 (प्रतिनिधी) हेळगाव-पाडळी ता.कराड येथे माणिक पाटील यांच्या मालकीच्या शेततळ्यात एका महिलेसह दोन मूलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बाराच्या सूमारास घडली आहे. या घटनेने पाडळी परिसर हदरला असून मजूरांच्यामध्ये भिताचे वातावरण पसरले आहे. मूळचे कराडच्या खराडे काॅलनीतील असलेले हे कूटूंबिये मजूरी निमित्त पाटील यांच्याकडे कामासह वासतव्याला होती.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार पाडळी येथिल शेततळ्यात त्याच परिसरात काम करणारे मजूर दररोज पोहण्यासाठी जात होते. यामध्ये लहान मूलासंह महिला-पूरूष ही सहभागी होत होते. आज नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी सर्व जण शेततळ्यात उतरले होते. ज्यांना पोहण्यास येत नाही अशांच्या मदतीला तळ्यात दोर्या बांधल्या होत्या. पोहण्यास न येणारे या दोरीला धरुन तळ्यात उतरले होते. याच दरम्यान दोरी अति भाराने तूटल्याने अनेक जण तळ्यात बूडाले. यावेळी पोहण्यास येणार्यांनी बूडालेल्या सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन मूलींसह एका महिलेला मात्र तळ्याबाहेर काढण्यास विलंब झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला असल्याचे तेथिल मजूरांनी सांगितले...पूढे वाचा...
आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेत सरस्वती रामचंद्र खडतरे (वय- 8), वैष्णवी गणेश खडतरे (वय- 15), शोभा नितीन घोडके (वय- 35) या तिघींचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद मसूर पोलिसात झाली आहे.कराडच्या काॅटेज येथे मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले.


Comments
Post a Comment