कराडच्या 'या' कार्यालयात 20 हजारांची लाच घेताना दोन लिपीक रंगेहात पकडले...
कराडच्या भूसंपादन कार्यालयात लाच घेताना दोन लिपीक रंगेहात पकडले...
कराड दि.19-(प्रतिनिधी) गेल्या काही दिवसात लाचखोरीचे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. ती थांबताना दिसत नाहीत. दोनच दिवसांपूर्वी नजीकच्या विटा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दोन लाखाचे लाच घेताना पकडले होते. ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा कराडच्या प्रांत आॅफिसमधील भूसंपादन विभागातील दोघा कंत्राटी लिपिकांना वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना घडल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70) कंत्राटी लिपिक, भूसंपादन शाखा, प्रांत ऑफिस व दिनकर रामचंद्र ठोंबरे (व 70) कंत्राटी लिपिक भूसंपादन शाखा प्रांत ऑफिस, असे रंगेहात पकडलेल्या लाचखोर लिपिकांची नावे आहेत.या दोघांनी दहा दहा हजार रूपये मागितले होते...पूढे वाचा...
याबाबत अधिक माहिती अशी की शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असलेले तक्रारदार यांनी येरवळे ता. कराड गावच्या 9 शेतकरी यांच्याकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावा करण्याकरता प्रतिज्ञापत्र घेतलेले आहे. त्याप्रमाणे तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कराड कार्यालय येथे मूल्यांकन प्रक्रिया बाबत पाठपुरावा करण्याकरता गेले असता त्यावेळी वरील दोघां लिपिकांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याकरता लाचेची मागणी करून लाच रक्कम वीस हजार रुपये आज स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्वला वैद्य, पोलीस निरीक्षक विक्रम पवार, स.पो.ऊप.नि शंकर सावंत, पो.ना. निलेश राजपुरे पो.शि. विक्रमसिंह कणसे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.


Comments
Post a Comment