Posts

Showing posts from May, 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे ६ जून रोजी प्रकाशन...

Image
  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे ६ जून रोजी प्रकाशन... राजभवन येथे सायंकाळी ५ वाजता महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन... मुंबई दि.31-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून देणाऱ्या 'दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई' चरित्रग्रंथाचे प्रकाशन मंगळवार, ६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता होत आहे. महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राजभवन येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.  महाराष्ट्राच्या गृह, सार्वजनिक बांधकाम, कृषी, शिक्षण आदी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत  राज्याच्या उभारणीत अमूल्य योगदान देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे लेखन/संपादन ज्येष्ठ पत्रकार-संपादक मधुकर भावे यांनी केले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राबविलेली धो...

कुस्तीपट्टूंना न्याय न दिल्यास आंदोलन;बळीराजा शेतकरी संघटना, कराडात आसूड ओडत प्रशासनाला निवेदन...

Image
कुस्तीपट्टूंना न्याय न दिल्यास आंदोलन;बळीराजा शेतकरी संघटना, कराडात आसूड ओडत प्रशासनाला निवेदन... कराड, दि. 29 (प्रतिनिधी) दिल्लीत सूरू असलेल्या कुस्तीपट्टूंना न्याय न दिल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज येथील तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी बळीराजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासकीय कार्यालय परिसरात काढण्यात अलेल्या आसूडाच्या फटक्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.यावेळी मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देत तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली...पूढे वाचा... दरम्यान, विविध मागण्यांसाठी निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, नूतन प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, पश्चिम महाराष्ट्र युवाध्यक्ष गणेश शेवाळे, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते....पूढे वाचा...   या निवेदनात म्हटले आहे की, गेले सहा महिने पंत...

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत जमिनीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करा...

Image
अव काळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत जमिनीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करा... सातारा दि.29. जिल्ह्यात आज झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतजमिनीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले...पूढे वाचा... जिल्ह्यात आज झालेल्या अवकाळी पावसाची  तात्काळ जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी  यांच्या कडून माहिती घेऊन उद्या सकाळीच नुकसानग्रस्त शेतजमिनीची पहाणी करुन तत्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरुन  दिले.

कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन मधील दोन अभ्यासक्रमांना एनबीए मानांकन...

Image
  कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन मधील दोन अभ्यासक्रमांना एनबीए मानांकन... कराड, दि.28: शासकीय तंत्रनिकेतन, कराड मधील विद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या दोन पदविका अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले. संस्थेने गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते घडविण्यासाठी आजवर घेतलेल्या कष्टाची ही पोच पावती आहे. नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीने संस्थेस दि.२८ ते ३० एप्रिल या कालावधीत भेट देऊन पाहणी केली होती. शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक आकलनातील प्रगती, निकालातील सातत्य, महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, करियर गाईडन्स, प्लेसमेंट, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे संस्थेबद्दलचे मत अशा विविध मुद्यांवर समितीने पाहणी केली होती. शासकीय तंत्रनिकेतन, कराड या राज्याच्या ग्रामीण भागातील पदविका अभियांत्रिकी संस्थेस एन.बी.ए. मानांकन मिळणे हा मोठा बहुमान आहे. संस्थेने गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते ...

कराडच्या नूतन डीवायएसपी यांनी घेतली आ.पृथ्वीराज चव्हाण यांची भेट.....

Image
  कराडच्या आजी माजी डिवायएसपींनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांची घेतली भेट... कराड दि.26-कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्त झालेले नूतन डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेऊन चर्चा केली. तसेच पूर्वीचे डि.वाय.एस.पीं. डॉ रणजित पाटील या यांनीही आज आ. चव्हाण यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.  यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नवनियुक्त डि.वाय.एस.पीं. अमोल ठाकूर यांचे स्वागत केले. तसेच मावळते डि.वाय.एस.पीं. डॉ रणजित पाटील यांनी कराड विभागात आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद देत त्यांचा सत्कार केला. दरम्यान आजी माजी डि.वाय.एस.पीं.यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कराड तालुक्यातील सध्य परिस्थिती बाबत चर्चा केली. यावेळी नूतन डि.वाय.एस.पीं. अमोल ठाकूर यांना कायमच सहकार्य राहील असे आ. चव्हाण यांनी आश्वासित केले.

दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने 'शासन दिव्यांगांच्या द्वारी' अभियान...

Image
  शासन दिव्यांगांच्या द्वारी अभियान... मुंबई दि.25-दिव्यांगांना शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे सहजतेने उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या द्वारी’ हे अभियान 6 जून 2023 पासून प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगत्वाचे वैश्विक ओळखपत्र, शेतजमिनी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक ती प्रमाणपत्रे दिव्यांगांना उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांचे एकूण 21 प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. सन 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात 16 लाख 92 हजार 285 पुरुष तर 12 लाख 71 हजार 107 स्त्रीया असे एकूण 29 लाख 63 हजार 392 दिव्यांग आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. विविध शासकीय योजनांचा दिव्यांगांना लाभ घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख मार्गदर्शकांच्...

विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली; बारावीचा उद्या निकाल जाहीर होणार...

Image
विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली; बारावीचा उद्या निकाल जाहीर होणार... मुंबई दि.24-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकालाची प्रतिक्षा संपली आहे. बारावीचा निकाल उद्या दि.25 रोजी दुपारी 2 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.  गूरूवारी निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे ते 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी बोर्डाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. व उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे. उद्या दुपारी दोन वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे महत्त्वाची; राज्यपाल रमेश बैस...

Image
जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे महत्त्वाची; राज्यपाल रमेश बैस... सातारा दि.23- सातारा पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.  राजभवन महाबळेश्वर येथे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल महोदय यांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.  पाणी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून राज्यपाल श्री बैस म्हणाले, फार पूर्वीपासून मानवी वसाहती या पाण्याच्या काठी वसल्या आहेत. आजही पाण्याच्या काठीच शहरे विकसित होत आहेत. अलीकडे वातावरण बदलामुळे पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती बदलत आहे. याचा विचार करून जल संधारणाची कामे करावीत. महाबळेश्वरच्या क्षेत्रात...

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे नवनिर्मितीला चालना देणारे; ना. चंद्रकांतदादा पाटील...

Image
  नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे नवनिर्मितीला चालना देणारे; ना. चंद्रकांतदादा पाटील... कराड, दि.19 : प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सक्षमपणे घडविण्यासाठी आणि व्यक्तीच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णपणे लागू करण्याचा निर्धार केला आहे. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे नवनिर्मितीला चालना देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. कृष्णा विश्व विद्यापीठ संलग्न कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा विद्यापीठात ‘जैवतंत्रज्ञान विकास’ या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचा आज समारोप झाला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. तसेच कुलपतींचे प्रमुख सल्लागार डॉ. व...

कराडात RRR सेंटर्सचे उदघाटन; मोठ्या प्रमाणात वापरा योग्य साहित्य जमा...

Image
  कराडात RRR सेंटर्सचे उदघाटन; मोठ्या प्रमाणात वापरा योग्य साहित्य जमा... कराड दि.19- (प्रतिनिधी) केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय (MOHUA) आदेश नुसार कराड नगर परिषदे मार्फत "मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर" हे अभियान सूरू करण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत आज नगरपरिषदे नजीक "रिड्यूस, रियुज आणि रिसायकल" सेंटर्स म्हणजेच RRR केंद्राचे बॅंक आफ इंडियाचे माजी शाखा अधिकारी व पर्यावरण प्रेमी प्रफुल्ल ठाकूर, पर्यावरण मित्र चंद्रकांत जाधव, आरोग्य अभियंता आर डी भालदार यांच्या ऊपस्थित आज उदघाटन करण्यात आले. यावेळी वरीष्ठ मुकादम मारूती काटरे, मूकादम अभिजित खवळे, प्रमोंद कांबळे, अशोक डाईंगडे, संजय चावरे, भास्कर काटरे, विनोद कसबे उपस्थित होते. कराड नगरपरिषदेच्या आण्णाभाऊ साठे समाज मंदीरात हे मुख्य केंद्र सूरू झाले असून पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात 14 ठिकाणी अशी केंद्रे सूरू करण्याचे नियोजन असून निरूपयोगी वस्तू कमी करणे, त्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, प्रक्रिया करणे हा उद्देशाने हे अभियान सूरू करण्यात आल्याची माहिती यावेळी आरोग्य अभियंता आर डी भालदार यांनी दिली. नागरिका...

युवापिढीत उद्योजकतेची भावना रुजविण्याची गरज : डॉ. पंडित विद्यासागर...

Image
  कराड : कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेत स्मरणिकेचे प्रकाशन करताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर व कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस डावीकडून डॉ. गिरीश पठाडे, डॉ. ए. एम. देशमुख, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. परशराम पाटील, डॉ. नीलिमा मिश्रा. युवापिढीत उद्योजकतेची भावना रुजविण्याची गरज : डॉ. पंडित विद्यासागर... कृष्णा विश्व विद्यापीठात राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेस प्रारंभ; देशभरातून 400 जणांचा सहभाग... कराड दि.2-भारताने विज्ञान-तंत्रज्ञानाचे धोरण स्वीकारल्याने भारताचा विकास होऊ शकला. येत्या काळात याच धोरणाला पुढे नेत युवापिढीत उद्योजकतेची भावना रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. कृष्णा विश्व विद्यापीठ संलग्न कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोस...

पून्हा एखदा नोटबंदी;दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार...

Image
  पून्हा एखदा नोटबंदी;दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार... दिल्ली दि.19-दोन हजार रुपयांची नोट आता चलनातून बंद होणार आहे. आरबीआयने याबाबत निर्णय घेतला असून 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा चालणार आहेत. या दरम्यान नागरिकांना नोटा बदलून घ्याव्या लागतील.जसे 2016 मध्ये नोटबंदी नंतर शंभर,पाचशे,हजार रूपयांचा नोटा बंद करून त्या बदलून देण्यात आल्या होत्या.त्यावेळी देशभरात हाहाकार माजला होता. आज रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला असून बाजारातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वापरता येणार असल्याचे RBI ने म्हटले आहे. 2018-19 मध्येच या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.आता दोन हजारांच्या  नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हंटले आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. दरम्यान ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून आता नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. एका वेळी नागरिकांना किती नोटा बदलता येणार......

कराडच्या 'या' कार्यालयात 20 हजारांची लाच घेताना दोन लिपीक रंगेहात पकडले...

Image
  कराडच्या भूसंपादन कार्यालयात लाच घेताना दोन लिपीक रंगेहात पकडले... कराड दि.19-(प्रतिनिधी) गेल्या काही दिवसात लाचखोरीचे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. ती थांबताना दिसत नाहीत. दोनच दिवसांपूर्वी नजीकच्या विटा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दोन लाखाचे लाच घेताना पकडले होते. ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा कराडच्या प्रांत आॅफिसमधील भूसंपादन विभागातील दोघा कंत्राटी लिपिकांना वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना घडल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. रामचंद्र श्रीरंग पाटील (वय 70) कंत्राटी लिपिक, भूसंपादन शाखा, प्रांत ऑफिस व दिनकर रामचंद्र ठोंबरे (व 70) कंत्राटी लिपिक भूसंपादन शाखा प्रांत ऑफिस, असे रंगेहात पकडलेल्या लाचखोर लिपिकांची नावे आहेत.या दोघांनी दहा दहा हजार रूपये मागितले होते... पूढे वाचा... याबाबत अधिक माहिती अशी की शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असलेले तक्रारदार यांनी येरवळे ता. कराड गावच्या 9 शेतकरी यांच्याकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावा करण्याकरता प्रतिज्ञापत्र घेतलेले आहे. त्याप्रमाणे तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कराड कार्यालय ये...

कराडात "मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर" या अभियानास प्रारंभ...

Image
  कराडात " मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर" या अभियानास प्रारंभ... कराड दि.19- (प्रतिनिधी) केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय (MOHUA) आदेश नुसार कराड नगर परिषदे मार्फत "मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर" हे अभियान सूरू करण्यात आले आहे. पूढील तीन आठवड्यांच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. कराड नगरपरिषदे कडून "रिड्यूस, रियुज आणि रिसायकल" सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रे पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात 15 ठिकाणी स्थापन केली असल्याची माहिती आरोग्य अभियंता आर डी भालदार यांनी दिली.   शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लॅस्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी "रिड्यूस, रियुज आणि रिसायकल" सेंटर्स म्हणजेच RRR सेंटर्स येथे जमा करावीत जेणेकरून संकलित कलेल्या वस्तू नुतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादन तयार करण्यासाठी उपयोगी ठरतील अशी माहिती ही आरोग्य अभियंता भालदार यांनी दिली. नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन ही करण्यात आले आहे. कुणाकडे खूप कपडे व अन्य दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत, ...

मलकापूर ढेबेवाडी फाटा परिसरातील अनेक कामे मार्गी;प्रशासन, कंपनी अधिकार्‍यांकडून कामांची पाहणी, दादा शिंगण यांच्या पाठपूराव्याला यश...

Image
  मलकापूर ढेबेवाडी फाटा परिसरातील अनेक कामे मार्गी;प्रशासन, कंपनी अधिकार्‍यांकडून कामांची पाहणी, दादा शिंगण यांच्या पाठपूराव्याला यश... कराड दि.19-(प्रतिनिधी) कराड तालुका मनसेचे अध्यक्ष दादा शिंगण यांच्या विविध मागण्यांची दखल घेऊन प्रशासन व कंपनीच्यावतीने विविध समस्या दूर केल्या आहेत.या झालेल्या कामांची आज सबंधित अधिकारी, नगरपरिषद अधिकारी, वाहतूक अधिकारी यांनी पाहणी केली. मलकापूर येथील रहिवाशांना महामार्गाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी, रोज होणारे अपघात व अन्य अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या अडचणी दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मलकापूर, ढेबेवाडी फाटा येथे होणारी वाहतुक कोंडी व पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणारे पाणी, गटर दूरूस्ती तात्काळ करुन अन्य कामांची दखल घेऊन प्रशासन, महामार्ग तसेच ठेकेदार कंपनीकडून संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी पूढाकार घेतला आहे. ढेबेवाडी फाटा येथे दोन्ही बाजूला नवीन रस्ते केल्याने वाहतुक कोंडी कमी झाली आहे. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी गटर साफसफाई सूरू केली आहे. सध्या महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी वाहतूक कोंडी व अपघात यामुळे ना...