कराड बाजार समिती निवडणूक;दोन्ही पॅनेलचे उमेदवार जाहिर.....

कराड बाजार समिती निवडणूक;दोन्ही पॅनेलचे उमेदवार जाहिर.....

कराड दि.20 (प्रतिनिधी) कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलच्या वतीने आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही पॅनेल कडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. ही निवडणुक शेतकरी विकास पॅनल विरूध्द स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेल मध्ये होत आहे. या निवडणूकीत हमाल मापाडी गटातील रयत पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली आहे. या निवडणूकीत एकूण 73 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.यापैकी तब्बल 38 जणांनी माघार घेतली आहे. आता 17 जांगासाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत.

शेतकरी विकास पॅनेल-कृषी विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण गटातून जगदीश दिनकरराव जगताप, मानसिंगराव वसंत जगदाळे, दयानंद भीमराव पाटील, उद्धवराव बाबुराव फाळके, विनोद रमेश जाधव, दत्तात्रय वसंतराव साळुंखे, जयवंत बबन मानकर, महिला प्रतिनिधी गटातून मालन देवाप्पा पिसाळ रेखाताई दिलीप पवार, इतर मागास प्रवर्गातून फिरोज अली इमानदार इनामदार, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून मारुती आनंदा बुधे, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटातून मानसिंग आनंदराव पाटील, प्रदीप रघुनाथ शिंदे तर अनुसूचित जाती जमाती मधून अंकुश रामचंद्र हजारे व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून आनंदराव भीमराव मोहिते व्यापारी अडते मतदार संघातून संतोष कृष्णत पाटील, राजेश रणजीत शहा यांचा समावेश आहे.

लोकनेते स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या अधिकृत उमेदवार मध्ये सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघातून विजयकुमार सुभाष कदम, मोहनराव एकनाथ माने, अशोक बाबुराव पाटील, दीपक (प्रकाश) आकाराम पाटील, शैलेश उत्तमराव चव्हाण, प्रमोद बाळासो कणसे, वामन संतराम साळुंखे तर महिला राखीव मधून विजयमाला रामचंद्र मोहिते, इंदिरा बाबासो जाधव-पाटील, भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी श्रीमंत काकडे इतर मागास प्रवर्गातून सर्जेराव रामचंद्र गुरव, सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदार संघातून संभाजी लक्ष्मण चव्हाण, राजेंद्र रमेश चव्हाण, आर्थिक दुर्बल ग्रामपंचायत मतदार संघातून शंकर दिनकर इंगवले, अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत मतदार संघातून नितीन भिमराव ढापरे, व्यापारी अडते मतदार संघातून जयंतीलाल चतुरदास पटेल जगन्नाथ बळी लावंड या उमेदवारांचा समावेश आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक