कराडात दोन झाडांवर वीज कोसळली;तालुक्यात पावसाने शेत-पिकांचे नूकसान....
कराडात दोन झाडांवर वीज कोसळली;तालुक्यात पावसाने शेत-पिकांचे नूकसान....
कराड दि.20 (प्रतिनिधी)कराड शहर व परिसरा बरोबर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. पाभसाने कराड तालुक्यातील काही भागात अनेक पिकांचे नुकसान झाले असून शहरातील पंताचा कोट व शुक्रवार पेठेत जूने वाॅटर हाऊस येथे वीज पडल्याने दोन झाडे जळाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये असलेल्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेठ घेतला तसेच शाळेच्या इमारतीचे किरकोळ नुकसानही झाले. अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत झाडावरील आग विझवली.
कराड तालुक्यातील दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विजांच्या कडकटासह आलेल्या पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कालवडे, बेलवडे, कासार शिरंबे परिसरात गारांसह पाऊस झाला असून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. या परिसरात असणाऱ्या काही केळीच्या बागाही कोलमडून पडल्या आहेत.
दरम्यान आज कराड शहरात गुरुवार बाजाराचा दिवस असल्याने मंडई परिसरात बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांची अचानक आलेल्या पावसाने चांगलीच तारांबळा उडाली तर बाजारपेठेत ही पावसाने व्यापाऱ्यांची धांदल दिसून आली. गेली तीन दिवस झाले मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचेही अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत.आज आलेल्या पावसाने काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी गरमी कायम आहे.
Comments
Post a Comment