‘कृष्णा’तर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त कुसूर येथे 200 जणांची मोफत आरोग्य तपासणी...
‘कृष्णा’तर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त कुसूर येथे 200 जणांची मोफत आरोग्य तपासणी...
कराड, दि 20 : जागतिक आरोग्य दिनानिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठाच्यावतीने कुसूर (ता. कराड) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. सुमारे २०० हून अधिक ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घेतला.
विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा फार्मसी महाविद्यालय, कुसूर प्राथमिक आरोग्य केंद्र व कुसूर ग्रामपंचायतींच्या संयुक्त सहकार्यातून पार पडलेल्या या शिबीराचे उद्घाटन सरपंच उदयसिंह कदम यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरात ग्रामस्थांची उंची – वजन गुणोत्तर, रक्तदाब, रक्तातील साखर आदी चाचण्या करुन मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, विकास कंक, दिलीप मोरे, सुनील पाटील, सोसायटीचे चेअरमन यशवंत कराळे, व्हाईस चेअरमन नरेंद्र मोरे, सदस्य बाबुराव मोरे, डॉ. विक्रांत हिवरे, प्रा. अमिना शहाजहान, अनुप पाटील, जनसंपर्क अधिकारी सागर पवार, रईस पटेल, शेखर देशमुख, महेश देशमुख, सतीश कांबळे, अपर्णा देसाई, दिपाली कणसे, महेंद्र अलाटे यांच्यासह डॉक्टर, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment