महामार्गावरील जूना ब्रिटिशकालिन पूल अखेर जमिनदोस्त;मलकापूरचा पूल पाडण्याचे काम लवकरच सूरू होणार...
वाठार येथिल जूना ब्रिटिशकालिन पूल अखेर जमिनदोस्त;मलकापूरचा पूल पाडण्याचे काम लवकरच सूरू होणार...
कराड दि.16 (प्रतिनिधी) पुणे बेंगलोर महामार्गावर सध्या कागल ते शेंद्रे दरम्यान सहा पदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. या यामधील पेठ नाका ते शेंद्रे या 67 किलोमीटर अंतरावरील सहा पदरीकरणाचे काम अदानी अंतर्गत डी पी जैन कंपनीने सुरू केले आहे. या अंतर्गत कराड शहरातील कोल्हापूर नाका येथील उड्डाणपुलाचे पाडकाम पूर्ण करण्यात आले असून मलकापूर व नांदलापूर भरावाचा पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. वाठार ता.कराड येथील दक्षिण मांड नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल जमीनदोस्त करण्यात आला आहे. गेली आठ दिवस झाले हे पाडकाम काम सुरू होते. अखेर आज तो पूल पूर्ण जमिनदोस्त करण्यात आला.
दरम्यान कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल नंतर मलकापूर व नांदलापूर येथील भरावाचा पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक वळवण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्या अनुषंगाने काल कोल्हापूर बाजूकडे जाणारी वाहतूक व आज सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक महामार्गावरून सर्विस रोडवर वळवून चाचणी घेण्यात आली. महामार्गावर दोन्ही बाजूस सर्विस रस्त्यावरून महामार्गावर व महामार्गावरून सर्विस रस्त्यावर जाणार्या ठिकाणी वळण मार्ग व रस्ता करण्यात आला आहे.
महामार्गावरील मलकापूर नजीकचा मोठा भरावाचा पूल पाडण्याचे नियोजन सध्या पूर्ण आहे. मात्र वाहतुकीचा मोठा प्रश्न उद्भवल्याने तसेच दहावी बारावी परीक्षा सुरू असल्याने या परीक्षार्थींच्या वर या वाहतुकीचा परिणाम होऊ नये म्हणून काही पर्यायी मार्ग व पोलिसांच्या परवानगीची प्रतीक्षा यामुळे सदर पूलाचे पाडकाम लांबणीवर गेले आहे. मात्र सदर पुलाचे पाडकाम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी सबंधित कंपनी व पोलिस प्रशासनास दिलेल्या सूचनानूसार सध्या नियोजन केले जात आहे.

Comments
Post a Comment