कराडचे वैभव - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण...

 


कराडचे वैभव - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण... 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पन्नास वर्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. दीर्घ राजकीय परंपरा असलेल्या चव्हाण कुटुंबातील पृथ्वीराज चव्हाण यांची निष्कलंक, स्वच्छ चारित्र्य आणि अभ्यासू म्हणून राजकारणात प्रतिमा आहे. केंद्रीय राजकारणात सर्वोच्च पदे, जबाबदाऱ्या भूषविल्यानंतर एका विशिष्ट अशा राजकीय परिस्थितीत त्यांच्यावर राज्याची जबाबदारी पडली आणि ती त्यांनी निष्टेने पार पाडत कर्तृत्व सिद्ध केले. चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच आपले होम टाऊन असलेल्या कराडच्या विकासावर निधीची बरसात केली. त्यामुळे कराड तालुक्यात आज ही विकासकामांचा धुमधडाका सुरु आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नामूळेच कराडच्या जून्या ब्रिटीशकालिन पूलाच्या दूरूस्ती व मजबूतीकरण होऊ शकल्याने आज सहापदरीकरण कामामूळे निर्माण झालेल्या मोठ्या अडचणीत कराड शहरात येणारी जाणारी वाहतूक सूरळीत सूरू आहे.

पृथ्वीराज बाबा फक्त निधी देऊन थांबले नाहीत, तर ती कामे पूर्णत्वास नेऊन प्रत्यक्षात साकारली. यालाच म्हणतात वचनपूर्ती! मुख्यमंत्री असताना १ हजार ८०० कोटी इतका भरघोस निधी केवळ कराड तालुक्याच्या विकासासाठी दिला. त्यानंतर आज पर्यंत बाबांनी आमदार फंडातून ही कराड शहरासह दक्षिण मतदार संघासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी आणून विकास काम सूरू ठेवले आहे.त्यांनी आणलेल्या या निधीतून सुरु झालेल्या आणि सुरु असलेल्या कामांमुळे कराडची वाटचाल जिल्हा निर्मितीकडे सुरु झाली आहे. आमदार झाल्यानंतर सुद्धा पृथ्वीराज बाबांचा विकासकामांचा धडाका असाच सुरु ठेवला आहे.

कराड म्हटले कि स्व. यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ आठवतो. त्यांनी आपल्या कार्यकाळात कराडला विकासाची दिशा दाखविली. चव्हाण साहेबांनी विकासाचा पाया रचला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर कळस चढविला. उच्च विद्याविभूषित असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या शालेय दशेतील शिक्षणाची परिस्थिती आणि आजचा स्पर्धात्मक काळ यामधील दरी ज्ञात होती. हि दरी भरून काढण्यासाठी काय करायला हवे याची त्यांना जाणीव होती. तसेच एखाद्या प्रदेशाची चौफेर भरभराट होण्यासाठी काय-काय सुविधा हव्यात याचा अभ्यासही होता. म्हणून सर्वप्रथम त्यांनी सुसज्ज विमानतळ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भूकंप संशोधन केंद्र यांसारख्या कामांना प्राधान्य दिले. या शास्त्रोक्त कामांमुळे कराडची ओळख आणि नोंद देशाच्या नकाशावर झाली. सातारा जिल्हा आणि कराड तालुक्याच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून पृथ्वीराज चव्हाण कार्यरत राहिले. त्याचा सकारात्मक परिणाम गेल्या चार वर्षात ठळकपणे दिसून येतोय.

चव्हाण कुटुंबियांना पन्नास वर्षांची दीर्घ राजकीय परंपरा आहे. कराड लोकसभा मतदार संघात या कुटुंबाचा राजकीय दबदबा राहिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील स्व. दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण, मातोश्री स्व. प्रेमालाकाकी चव्हाण या दाम्पत्याने कराड लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. १९९१ साली स्व. राजीव गांधींच्या आग्रहास्तव पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारणात यावे लागले. जगात माहिती-तंत्रज्ञानाचा उगम होत असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे तंत्रज्ञ राजकारणात यावेत असा राजीव गांधींचा विचार आणि प्रयत्न होता. म्हणूनच पृथ्वीराजबाबांना त्यांची इच्छा आणि आग्रह डावलता आला नाही. नवखे असूनही कराडकरांनी चव्हाण कुटुंबावरील प्रेम, श्रद्धा आणि निष्टेमुळे पृथ्वीराज बाबांना लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. तीनवेळा कराडकरांनी त्यांना लोकसभेत नेतृत्वाची संधी दिली. मध्यंतरीपृथ्वीराज बाबांना पक्ष नेतृत्वानेही त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, काँग्रेसचे सरचिटणीस आणि विविध राज्यांच्या निवडणुकीमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. या सर्व जबाबदाऱ्या बाबांनी निष्ठापूर्वक आणि इमाने इतबारे पार पाडल्या. 

महाराष्ट्रात २०१० च्या सुमारास राजकीय पेचप्रसंग उद्धभविल्यानंतर पक्षश्रेष्टींना नेतृत्व बदल करण्याशिवाय पर्याय नव्हता. अशावेळी मुख्यमंत्री पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचेच नाव पुढे आले. बाबा महाराष्ट्राचे मुख्यंमत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल पन्नास वर्षानंतर कराडला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना बाबांनी सातारा जिल्हा तसेच कराड तालुक्याला भरभरून निधी देऊन विकास केला. कराड शहराला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय परंपरा आहे. या परंपरेला साजेसा विकास विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी पाऊल उचलले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गाव, वाडीवस्तीवरील विकासाला मुख्यमंत्री कार्यकाळात भरघोस निधी मिळाला. जलसंधारणाच्या कामाला बाबांनी प्राधान्य दिले. सिमेंट साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून सिंचनाचे आदर्श मॉडेल राज्यापुढे ठेवले. 

दुष्काळाच्या काळात जनावरांच्या छावण्या, चारा छावण्या, टँकरने पाणी पुरवठा यासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देत दुष्काळ सुसह्य केला. उरमोडी योजनेचे पाणी दुष्काळी भागात आणले. राज्यातील प्रत्येक जिल्हा, जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, तालुक्यातील गावे आणि वाड्यावस्त्यांच्या विकासासाठी मागणीइतका किंबहुना त्याहून अधिक निधी देताना बाबांनी हात सैल सोडला. यातून अनेक वर्षे रखडलेल्या विकासाची कोंडी फुटली. विकास करताना त्यांनी देशाचा महाराष्ट्राचा विकासदर वाढला पाहिजे यालाही प्राधान्य दिले. म्हणूनच सहकार, आद्योगिक, कृषी, वीज, कामगार या क्षेत्रातील त्यांचे निर्णय महत्वपूर्ण ठरले.

कराडसाठी भरभरून निधी....... 

मुख्यंमत्री असताना आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा बाबांनी कराडच्या विकासाचा रथ पुढेच आणला आहे. मुख्यंमत्री असताना जी विकासकामे कराडला केली त्यामुळे कराडची जिल्हा होण्याकडे वाटचाल सुरु झाली. आणि या विकासकामामुळेच कराडची विकासात्मक अशी ओळख निर्माण झाली. यामधीलच महत्वाची विकासकामे..... 

- स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचे सुशोभीकरण, कृष्णा पूल ते जूना कोयना पूल सरंक्षक भिंतीसाठी भरीव निधी, पहिला टप्पा पूर्ण तर दूसरा टप्पा अंतिम टप्यात.

- कराड शहराच्या हद्दवाढीचा ऐतिहासिक निर्णय 

- कराडला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण, रस्त्यांच्या चौपदीकरणामुळे दळणवळण वाढणार 

- आगाशिव डोंगराचा पर्यटन विकास 

- कराड उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) कार्यालय मंजुरीसह नवीन इमारत पूर्ण,एम एच 50 नवीन ओळख.

- ५५० कोटी रुपयांचे भूकंप संशीधन केंद्र सध्या सूरू आहे.

- शासकीय कृषी महाविद्यालयामुळे शैक्षणिक क्रांती 

- प्रशासकीय इमारतीमुळे कराडची जिल्ह्याकडे वाटचाल 

- यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनासाठी भरीव निधी 

- पोलिसांसाठी दर्जेदार गृहसंकुल पूर्ण

- नवीन विश्रामगृहाचा मोठा विस्तार,प.महाराष्ट्रातील सर्वात मोठे विश्रामगृृह पूर्ण. दिवाणी, सत्र न्यायालयाची नवीन इमारत पूर्ण.

- स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचा मेकओव्हर 

- शनिवार पेठेत बहुमजली प्रशासकीय इमारतीसाठी निधी 

- कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका रस्त्यासाठी ११ कोटींचा भव्य रस्ता.

- कराड हद्द वाढीतील भागाच्या विकासासाठी ८ कोटींचा निधी 

- कोल्हापूर नाका येथे स्व. यशवंतराव चव्हाण कमानीसाठी ५५ लाखांचा निधी, काम पूर्ण.

- ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयलँडसाठी ४५ लाखांचा निधी, काम पूर्ण.

-जून्या ब्रिटीशकालिन कोयना पूलाचे मजबूतीकरण.

-रेठरे बु।। येथिल पूलाची दूरूस्तीसह या ठिकाणी नवीन पूलासाठी निधी.

-पाचवडेश्वर-कोडोली पूलासाठी निधी मंजूर,काम लवकरच सूरू होणार.

-कराड शहरात कोरोना काळात मोठा निधी आणला, नगरपरिषदेस एक रुग्नवाहिका व एक शववाहिका उपलब्ध करुन दिली.

-कराड शहरात पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी निधी, काम पूर्णत्वाकडे.

अशी विविध विकासकामे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री काळात केलीच पण आमदार झाल्यानंतर ही विविध कामासांठी निधी आणून कामे सूरू ठेवली आहेत. याचबरोबर कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. कराडसाठी बाबा विकासदूत बनले आहेत, भविष्यातही बाबांच्या माध्यमातून असेच कार्य सुरु राहे व त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभून जनतेची सेवा करण्याची संधी मिळो अशा कराडच्या जनतेच्या शुभेच्छा बाबांच्या पाठीशी कायम आहेत.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक