कराडात 2 एप्रिलला रंगणार कृष्णा मॅरेथॉनचा थरार;भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन...


कराडात 2 एप्रिलला रंगणार कृष्णा मॅरेथॉनचा थरार;भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन...

कराड, दि.17 : भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २ एप्रिल रोजी कराड येथे भव्य कृष्णा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्यदायी हृदयासाठी धावा’ असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार आहे. 

कराड येथील शिवाजी विद्यालय येथे आयोजित ही मॅरेथॉन १४ वर्ष  वयोगटाखालील, तसेच १५ ते २०, २१ ते ३०, ३१ ते ४०, ४१ ते ५० आणि ५१ वर्षावरील वयोगट अशा विविध गटांत होणार आहे. ५ कि.मी. स्पर्धेसाठी ३०० रुपये प्रवेश फी, १० कि.मी. स्पर्धेसाठी ४०० रुपये प्रवेश फी व २१ कि.मी. स्पर्धेसाठी ५०० रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार असून, सहभागी स्पर्धकांना टायमिंग बिब, टी शर्ट, मेडल, नाष्टा, ई-प्रमाणपत्र यासह आरोग्यविषयक सपोर्ट दिला जाणार आहे.....पूढे वाचा...

१० कि.मी. स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ३००० रु., २००० रु. व १००० रुपयांचे रोख बक्षीस; तर २१ कि.मी. स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ५००० रु., ३००० रु. व २००० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://bit.ly/krishnarun2023 या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी अथवा सतीश चव्हाण (मोबा. ९७६६६०१६७७), ओंकार ढेरे (मोबा. ९०७५२२५६५३) किंवा प्रा. विशाल साळुंखे (मोबा. ९८२२६५४०५७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक