प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून ऑटोरिक्षा भाडेवाढीस मान्यता...

 

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून ऑटोरिक्षा भाडेवाढीस मान्यता...

सातारा दि. 16 : विविध ऑटोरिक्षा संघटना यांनी केलेल्या मागणीवरुन प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सातारा यांनी परिचलन बैठकीत फेर विचार करुन ऑटोरिक्षा भाडे दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.

ऑटोरिक्षाकरिता प्रतिकिमी देय भाडे रु.20.08 पूर्णांकात देय भाडे रु.20.00 ऑटोरिक्षाकरिता किमान देय भाडे 1.5 कि.मी. साठी किमान देय भाडे रु.30.12 पूर्णांकात देयक भाडे रु.30.00.  रात्री 11.00 ते पहाटे 05.00 या कालावधीसाठी आकरावयाचे अतिरिक्त भाडे 40 टक्के निश्चित करण्यात आले आहे. 14 किलोपर्यंतच्या नगास भाडे आकारण्यात येणार नाही तथापी त्यापेक्षा जास्त वजनाच्या प्रत्येक नगास 03.00 आकारण्यात येईल. सुधारीत भाडे दर अंमलबजावणीकरिता दिनांक 16 फेब्रुवारी 2023 च्या पहाटेपासून लागू होईल. ज्या रिक्षाचे मिटरचे नवीन दराने कॅलिब्रेशन होऊन मिटर सिल झाले आहे त्यानांच नवीन दराने भाडे स्विकारता येईल. कॅलिब्रेशन व मीटर सिल होईपर्यंत जुन्या दरानेच भाडे स्विकारावयाचे आहे. भाडे रचना सुधारणा करण्यासाठी मीटरच्या पुनर्प्रमाणिकरणास दिनांक 16 फेब्रुवारी ते 1 एप्रिल 2023 इतका पंचेचाळीस दिवसांचा कालावधी आहे.

सातारा जिलह्यात ज्या ठिकाणी जास्त रिक्षा प्रवासी वाहतूक आहे त्या त्या ठिकाणी रिक्षा भाडे प्रदर्शित करावे.

रिक्षा ई-मीटर पुनर्प्रमाणिकरण (रिकॅलीब्रेशन-फेर बदल) विहित कालावधीमध्ये  न केल्यास मोटार वाहन कायदा 1989 च्या कलम 86 अंतर्गत परिवहन प्राधिकरणाला असलेल्या अधिकारानुसार विभागीय कार्यवाही होणे आवश्यक असल्याने  पुढे दर्शविलेल्या सूचीनुसार विभागीय कार्यवाही करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

विहित मुदतीत कॅलीब्रेशन न केल्यास 5दिवस परवाना निलंबन किंवा निलंबनाऐवजी तडजोड शुल्क 500  रुपये असेल,  याची जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा वाहन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे.




Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक