मोदींची जगभ्रमंती अदाणीसाठीच होती का ? - पृथ्वीराज चव्हाण...
मोदींची जगभ्रमंती अदाणीसाठीच होती का ? - आ.पृथ्वीराज चव्हाण...
कराड दि.16-: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ साली सत्तेत आल्यापासून देशात कमी पण बाहेरच्या अनेक देशांमध्ये भेटी दिल्या. पण आज अदानी घोटाळा बाहेर आल्यानंतर तसेच श्रीलंकेच्या अध्यक्षांनी अदानीला त्यांच्या देशातील एका कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी मोदींनी दबाव आणला असा आरोप केला, यावरून हेच दिसून येते कि, मोदींची जगभ्रमंती हि अदानीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठीच होती का ? असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तळबीड येथे काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानाच्या कार्यक्रमप्रसंगी केला.
काँग्रेसने सुरु केलेल्या हात से हात जोडो अभियान सातारा जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रभावीपणे राबविले जात आहे. काल तळबीड येथे या अभियानाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पदयात्रा काढून हात से हात जोडो अभियानाचा प्रचार केला. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत व सोसायटी संचालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. पूढे वाचा...
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजितराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, प्रा. धनाजी काटकर, सरपंच मृणालिनी मोहिते, कराड उत्तर किसान काँग्रेसचे अध्यक्ष उमेश मोहिते, कोयना दूध संघांचे चेअरमन वसंतराव जगदाळे, व्हा. चेअरमन बाबुराव ढोकटे, माजी जि. प. सदस्य प्रदीप पाटील, खरेदी विक्री संघांचे व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, प्रकाश पाटील सुपणेकर, संपतराव इंगवले, सुदाम चव्हाण, रंगराव थोरात, ऍड.अमृत पवार, राजू कदम, सिनेट मेंबर अमित जाधव, राजेंद्र पाटील, निवासराव निकम (आप्पा), अविनाश नलवडे, लहुराज यादव, वामनराव साळुंखे, रोहित पाटील, उमेश साळुंखे, वसंतराव पाटील, शैलेश चव्हाण, प्रताप पवार, दादासो चव्हाण, इंद्रजित जाधव, वहागावचे सरपंच संग्राम पवार, बाळासाहेब पवार, काका पाटील, दीपक पिसाळ, शिवराज पवार, प्रवीण वेताळ, पंकज पिसाळ, अजित केंजळे, तसेच तळबीड चा उपसरपंच वैशाली पाडळे, सोसायटीचे चेअरमन नंदकुमार मोहिते, व्हा. चेअरमन शशिकांत मोहिते यांचा सह. सर्व नवनिर्वचित ग्रा. प. सदस्य, सोसायटी संचालक, खरेदी विक्री संघांचे सर्व संचालक व तळबीड ग्रामस्थ उपस्थित होते. आदींच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते... पूढे वाचा...
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, गौतम अदानी हे श्रीमंतांच्या यादीत ६९० व्या स्थानी होते पण मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांच्या मैत्रीमुळे अदानीचा नंबर तिसऱ्या क्रमांकावर आला. मोदी पंतप्रधान होण्याआधी अदानींच्या विमानातून फिरत होते आता मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदानी मोदींच्या सरकारी विमानातून फिरत आहेत. अदानी व राहुल गांधी यांच्या मैत्रीबद्दलचे दाखले राहुल गांधी यांनी संसदेत अधिवेशनात मांडून देशाचे लक्ष वेधून घेतले पण मोदींनी त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी कोणतेतरी वेगळेच विषय संसदेत मांडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. तसेच राहुल गांधीच्या संसदेतील भाषणावर बंदी घातली व आता राहुल गांधींना केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण मागितले आहे. राहुल गांधींनी केलेले आरोप यांचे फोटो त्यांनी दाखविले होते तरी त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाईचा प्रयत्न होत आहे. पूढे वाचा...
मोदी सरकार लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवीत आहेत. देशात कोणीही सरकारच्या चुकीच्या निर्णयावर व कृतीवर बोलत असेल तर त्याचा आवाज बंद करायचा प्रयत्न सुरु आहे. त्यामध्ये मीडियाचे प्रतिनिधी सुद्धा सुटलेले नाहीत, तसेच आता बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या भारतातील कार्यालयात आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. यावरून मोदींना संविधानाप्रमाणे वागायचे नसून स्वतःची मनमानी करायची आहे यामुळे लोकशाही टिकविण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायची आहे यासाठी आपल्या सर्वाना एक होण्याची गरज आहे.
यावेळी उदयसिंह पाटील, निवासराव थोरात, भानुदास माळी, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील, मृणालिनी मोहिते आदींची भाषणे झाली. यावेळी उमेश मोहिते यांनी प्रास्ताविक केले तर अनिल मोहिते यांनी आभार मानले.




Comments
Post a Comment