महामार्गावर सहा पदरीकरण काम-मलकापूरात रस्ते-ठिकाणे-गावे दर्शवणारे फलक लावण्याची वाहनचालकांची मागणी....
मलकापूरात रस्ते-ठिकाणे-गावे दर्शवणारे फलक लावण्याची वाहन चालकांची मागणी....
कराड दि. (प्रतिनिधी) कराड नजीकचं महत्त्वाचं शहर व महामार्गालगत असणारे मलकापूर हे सर्व दृष्टीने एकदम ओके आहे. मात्र या मलकापूर शहरात सध्या महामार्गावरील सहा पदरीकरण कामामुळे वाहतूक वाढली आहे. महामार्गावरून मलकापूर शहरातील विविध रस्ते तसेच कराड शहरातून मलकापूर मार्गे महामार्गावर येणारे विविध रस्ते आहेत. मात्र या सर्व ठिकाणी कोणते रस्ते कुठे जातात, शहरातून बाहेर पडणारा व आत येणारा मार्ग दर्शवणारे कोणतेही फलक नसल्याने वाहन चालकांची मोठी कसरत होत आहे. सध्याच्या या परिस्थितीत मलकापूर नगर परिषदेने त्यांच्या हद्दीत सर्व ठिकाणी फलक लावणे गरजेचे असल्याचे वाहनधारकांच्याकडून मागणी होत आहे. पुढे वाचा.....
मलकापूर विकसीत झालेलं शहर आहे. मलकापूरात स्वच्छता ही आहे. मलकापूरची 24 x 7 पाणी योजना देशभर प्रशिध्द आहे.मलकापूरात रस्ते खुप चांगले आहेत.मात्र याच रोडवरुन जाताना कराड मलकापुर बाहेरील वाहनचालकांची सध्या कसरत होताना दिसत आहे. मलकापूरातील रस्ते, कॉलनी नावं रस्ते कुठे जातात, कोणता रस्ता कुठे जॉईन होतो, रस्ता पुढे कुठे जाणार आहे. याची माहिती दर्शवणारे फलक लावणे गरजेचे आहे. पुढे वाचा.....
मलकापूर फाटा, भारती विद्यापीठ, शिवाजी चौक, मलकापूर नगरपालिका ऑफिस, मलकापूर ग्रामदैवत लक्ष्मी मंदिर, गजानन महाजन मंदिर, शाळा, बैलबाजार रोड, कापिल, गोळेश्वरकडे जाणारे रोड, गोलघुमठ, नांदलापुर, मळाईदेवी पतसंस्था, जखिणवाडी व कोयना वसाहत, आगाशिवनगर कडे रोड, रस्ते दर्शवणारे फलक, बोर्ड, दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. जेणेकरुन मलकापूरचे रस्ते कुठे जातात, पुढे रस्ता कोणत्या ठिकाणी मिळतो हे वाहनचालकांना समजेल. मलकापूरात हायवे वरून गल्लीत जाणारे व गल्लीतून हायवे कडे जाणारे रोडवर ही फलकांची गरज आहे.मलकापूर नगरपरिषद, गोळेश्वर, कापील, जाखीणवाडी, आगाशिवनगर गोकाक पाणी पूरवठा ऑफिस, बैलबाजार, अजंठा पोल्ट्री, चांदे अप्पा नगर, वास्त्या, मळे या ठिकाणांचा उल्लेख असणारे फलक गरजेचे आहेत. पुढे वाचा.....
महामार्गावर सध्या मलकापूर व कराड पुलाचे पाडकाम सुरू असल्याने मलकापुरातून कराड कडे जाणारी वाहने मलकापूर बैल बाजार रोड पर्यंत आल्यानंतर डाव्या उजव्या बाजूला जाणारे रस्ते नेमके कुठे जातात हेच बऱ्याच बाहेरील वाटचालकांना समजत नाही याशिवाय कराड उत्तर ग्रामीण मधून बैल बाजार रोड ने मलकापूर मार्गे हायवे वर येणारी वाहने वाहन चालकांनाही मलकापुरातून मळाई देवी पतसंस्था या ठिकाणी जाणारी जे दोन रस्ते आहेत त्याचीही माहिती फलक लावल्यानंतर संचालकांना समजणार आहे. पुढे वाचा.....
मलकापूर फाटा, अक्षता मंगल कार्यालय, नवरंग हॉटेल या ठिकाणीही मलकापूर शहरात व बैल बाजार मार्केट यार्ड परिसरात जाणारे अनेक मार्ग आहेत. मात्र कोणत्या ही मार्गावर संबंधित ठिकाणे दर्शवणारे फलक नसल्यामुळे सध्या ठराविक रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे साईनगर, बैल बाजार परिसरातील अनेक रोडवरील नागरिक या वाहतुक कोंडीला वैतागले आहेत. त्यामुळे मलकापूर नगर परिषदेने तातडीने शहरात विविध ठिकाणी ठिकाणे, गावे, रस्ते दर्शवणारे फलक लावणे गरजेचे आहे.
कोल्हापूर नाक्यावर तसेच मलकापूर परिसरातील उड्डाणपूल भरावाचा पूल पाडण्यात येणार असल्याने कोल्हापूर नाक्यापासून मलकापूर कडे जाणारा रोड व कोयना वसाहत पासून कृष्णा हॉस्पिटल गेट, ढेबेवाडी फाटा, लाहोटी नगर, कोल्हापूर नाका यादरम्यानच्या तसेच बैल बाजार ते गोकाक मलकापूर रोडवरील विक्रेते नागरिकांचे अतिक्रमणे ही काढणे गरजेचे आहे.
रस्ता सुरक्षा व सुरक्षित प्रवास होऊन लोकांना सुविधा मिळाव्यात. हायवेचे काम चालू असल्याने वाहनचालक कुठं ही गाड्या घालू लागल्याने भरकटू लागले आहेत. मलकापूरात अशा काही सुविधा केल्या तर वाहनचालक नागरिकांचे समाधान होईल.मलकापूर नगराध्यक्षा निलिमताई येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व त्यांचे नगरसेवक याकडे लवकर लक्ष देतील अशी आशा वाहनचालकांची आहे.


Comments
Post a Comment