मलकापूर नजीक जनरेटरला आग;मोठी दूर्घटना टळली....


मलकापूर नजीक जनरेटरला आग;मोठी दूर्घटना टळली....

कराड दि.17 (प्रतिनिधी) पूणे-बेंगलोर महामार्गावर मलकापूर येथील कोयना औद्योगिक वसाहतीसमोर उड्डाणपूल पाडण्या कामी लावण्यात येणाऱ्या बॅरिगेटच्या कामासाठी संबंधित कंपनीने आणलेल्या जनरेटरला अचानक आग लागण्याची घटना घडल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. कराड अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पूढे वाचा...


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर उड्डाणपुलाचे पाडकाम थोड्या दिवसात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पुलाचे दोन्ही बाजूस बॅरिगेट लावण्याचे काम सुरू आहे. कोयना औद्योगिक वसाहतीसमोर बॅरिगेट लावण्यात आले आहेत. या ठिकाणी संबंधित बॅरिगेडचे वेल्डिंग करण्याच्या कामासाठी डंपर मधून जनरेटर आणण्यात आला होता. हा जनरेटर खाली उतरवत असताना जनरेटर मधून धुर येऊ लागला, अशातच तो जनरेटर पेटण्याची शक्यता असल्याने तात्काळ जनरेटर खाली उतरवण्यात आला मात्र काही क्षणात जनरेटरने पेट घेतला. याची माहिती तातडीने कराड नगरी नगरपरिषद अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाने तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेमुळे महामार्गावर व सर्विस रोडवर काही काळ वाहतूक मंदावली होती. पूढे वाचा...

दरम्यान कोल्हापूर नाका व मलकापूर येथील पूल पाडण्याच्या कामाबाबत संबंधित कंपनीने मोठ्या प्रमाणात सुरक्षितता घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एखादी आगीची घटना घडल्यास ती तात्काळ विजवण्याची यंत्रणा त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. आज स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र संबंधित कंपनीने यापुढे दक्षता घेणे गरजेचे आहे.

कराड टुडे आॅनलाईन न्यूज व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी, कराड-9822308552,9823141970 rajusanadi@gmail.com


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक