अभिनेते मकरंद अनासपुरे यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान...
अभिनेते मकरंद अनासपुरे यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान...
कराड-दि.18 (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 49 व्या स्मृतीदिनी आज स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपूरे यांना खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त व रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.गणपतराव कणसे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूरेश जाधव, प्रा.धनाजी काटकर, अॅड. विजयसिंह पाटील हे यावेळी उपस्थित होते.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य, प्रबोधन तसेच या क्षेत्रासह अभिनय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रतिभावंत अभिनेते मकरंद अनासपुरे यांना हा पूरस्कार देण्यात आला. 51 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाळ, श्रीफळ असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.
प्रारंभी खा.श्रीनिवास पाटील,अभिनेते मकरंद अनासपूरे,अॅड.उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी स्व.दादा उंडाळकर यांना पूष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत अॅड.उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.
कराड टुडे आॅनलाईन न्यूज व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी, कराड-9822308552,9823141970 rajusanadi@gmail.com


Comments
Post a Comment