कराडात वाहनचालकांची वाहतूक पोलिसांशी हुज्जत;30 वाहनचालकांवर कारवाई...
कराड दि.18 (प्रतिनिधी) महामार्गावर सहा पदरीकरणा अंतर्गत कोल्हापूर नाका-मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असल्याने कराड शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी सेवा रस्त्यावरून एकेरी मार्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र अनेक वाहनचालक या सेवा रस्त्यावरून उलट दिशेने जात असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा करुन वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत असल्याने वाहतूक शाखेने तीसहून अधिक वाहनचालकांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. सर्व्हिस रोडवरुन मलकापूरहून कराडचे दिशेने व कराड होऊन मलकापूरच्या दिशेने उलट जाणाऱ्या वाहनांनी वाहतुकीचे नियम पाळावेत अन्यथा कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही वाहतूक शाखेने दिला आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. कराड ते मलकापूर दरम्यान असलेला उड्डाणपूल पाडण्यात येत आहे. सदर पूल पाडण्याचे कामाचे वेळी सातारा बाजूकडून कराड व पुढे कोल्हापूर बाजूकडे जाणारी वाहतूक ही सेवा रस्त्यावरून मुख्य रस्त्या वळवून पुढे कोल्हापूर बाजूकडे वळवण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरहून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक लगतच्या सेवा रस्त्यावरून पुढे सातारा बाजूकडे वळवण्यात आली आहे....पूढे वाचा
दरम्यान या संबंधाने यापूर्वीच अधिसूचना जारी करून ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरीसुद्धा अनेक वाहनधारक हे सदर अधिसूचनेचे पालन न करता उलट दिशेने येऊन अपघातास निमंत्रण देत असल्याचे व पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण शाखा कराड यांच्यावतीने अशा उलट दिशेने येणारे व नियमांचे पालन न करणारे 30 पेक्षा जास्त वाहनचालकांचे वरती वाहतूक अधिनियमाण्वये कारवाई करण्यात आली आहे...पूढे वाचा..
वाहन चालकांनी उलट दिशेने न येता सर्व्हिस रोडवरुन एकेरी प्रवास करुन व वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे अन्यथा सदर मार्गावरून ऊलट दिशेने येणारे व नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांच्या विरुद्ध यापुढे आणखी कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून सेवा रस्ता व महामार्गावरील सूरक्षित वाहतूकीच्या दृष्टीने वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन कराड वाहतूक शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सरोजिनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी केले आहे.
कराड टुडे आॅनलाईन न्यूज व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी, कराड-9822308552,9823141970 rajusanadi@gmail.com


Comments
Post a Comment