महाराष्ट्रातील तरुणांनी सैन्यदलात अधिकारी व्हावे;कर्नल संभाजीराव पाटील, माजी सैनिकांच्या मेळाव्यात आवश्यक मदत करण्याची ग्वाही...

 

वीर पत्नी यांचा सन्मान करताना कर्नल डी. के. झा. समवेत विक्रम मोहिते, संभाजीराव पाटील, श्री. यादव, उत्तम दिघे, विजय पवार, अॅड. संभाजीराव मोहिते, रामचंद्र जाधव...

महाराष्ट्रातील तरुणांनी सैन्यदलात अधिकारी व्हावे;कर्नल संभाजीराव पाटील, माजी सैनिकांच्या मेळाव्यात आवश्यक मदत करण्याची ग्वाही...

कराड दि.14- सैन्यदलातील जवानांचा समाजात आदर हा झालाच पाहिजे. माजी सैनिकांनी देशाचा आदर्श नागरीक बनुन समाज सुधारणेसाठी प्रयत्न करावा. आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील सर्वांना शिस्त लावुन प्रत्येक घरातील एकतरी तरुन सैन्यदलात भरती होवुन तो अधिकारी व्हावा यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी लागेल ती मदत दिली जाईल. माजी सैनिकांना आपसातील, भावकीतील मतभेद मिटवुन एकोप्याने रहावे, असे आवाहन कर्नल संभाजीराव पाटील यांनी केले. 

माजी सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आयोजीत माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कर्नल डी. के झा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, भुमि अभिलेख उपाधिक्षक बाळासाहेब भोसले, अॅड. संभाजीराव मोहिते, स्टेट बॅंकेचे अधिकारी यादव, लेष्टनंट कमांडर दिग्वीजय जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव, मोहिते प्रतिष्ठानचे विक्रम मोहिते, महावितरणचे कार्यकारी अभियंता रविंद्र बुंदेले, जिल्हा सैनिक कार्यालयातील संघटक रामचंद्र जाधव यांच्यासह वीर माता, विर पिता, वीर पत्नी, त्यांचे कुटुंबीय, मिल्ट्री बॉईज अॅकेडमीचे विद्यार्थी, एसजीएम एनसीसीची सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

प्रांताधिकारी दिघे म्हणाले, भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलातील जवानांची आणि माजी सैनिकांची संख्या सातारा जिल्ह्यात मोठी आहे. माजी सैनिक निवृत्त होवुन गावी आल्यावर त्यांचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहील. आवश्यकता असल्यात मला आणि तहसीलदारांना थेट भेटावे. 

तहसीलदार पवार म्हणाले, अमृत वीर जवान अभियान शासनाकडुन सुरु आहे. त्याअंतर्गत सर्व सैनिकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणुक करण्याची कार्यवाही केली जाते. ज्यांचे अजुनही प्रश्न प्रलंबीत आहेत, त्यांनी थेट मला भेटुन त्या समस्या मांडाव्या. त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. कर्नल झा यांनी सैन्यदलात, प्रशासकीय सेवेत विद्यार्थी अधिकारी व्हावे यासाठी मी मार्गदर्शन करत असल्याचे सांगीतले. श्री. मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.     

यावेळी वीर माता, विर पिता, वीर पत्नी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित माजी सैनिकांचा प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले. देशभक्तीपर गिते मिनल ढापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली. कॅप्टन इंद्रजीत मोहिते यांनी प्रास्तविक केले. डॉ. स्नेहल राजहंस यांनी सुत्रसंचालन केले. सुभेदार मगरे यांनी आभार मानले. 

विजय दिवस समितीतर्फे रक्तदान शिबीर उत्साहात...

 विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन यंदा मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीराचे कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. या शिबाराला मोठा प्रतिसाद आज मिळाला. 

यशवंत ब्लड बॅंकेच्या सहकार्याने विजय दिवस समारोह समितीने यंदा येथील शिवाजी आखाड्यात आयोजन केले होते. शिबाराचे उदघाटन कर्नल पाटील यांच्या उपस्थितीत सौ. संध्या पाटील, तहसीलदार विजय पवार, मलकापुरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, कालिकादेवी कुटुंबप्रमुख मुनिर बागवान, शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख नितीन काशिद यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, उद्योजक राजेंद्र पाटील, रक्तदान उपक्रमाचे प्रमुख रमेश पवार, प्राचार्य गणपतराव कणसे, विनायक विभुते, पर्यावरण मित्र चंद्रकात जाधव, रमेश जाधव, प्रा. भगवान खोत, राजेश जाधव, रजनिश पिसे, भरत कदम, जालिंदर काशिद, रत्नाकर शानबाग, डॉ. संदिप यादव, मेजर एस मिश्रा, सुभेदार संजय पाटील, नायब सुभेदार संदीप पवार उपस्थित होते. शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी सैन्यदलातील अधिकारी, जवान यांनीही रक्तदान केले. 

विजय दिवसच्या चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद...

विजय दिवस समारोह समितीच्यावतीने रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन यंदा प्रथमच चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला शहरासह परिसरातील 30 शाळांतील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

येथील प्रितिसंगावरील बागेत या स्पर्धा कर्नल संभाजीराव पाटील, संध्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. त्या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सुधीर कुंभार यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय दिवस समितीचे पहिले ते दहाव पर्यंतच्या पाच गटात आणि खुल्या गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी जागेवरच युध्द, सैन्यदल, दशभक्तीपर विषय देण्यात आले. विद्यार्थ्यांनीही चांगली चित्रे रेखाटली आहेत. शहरासह परिसरातील ३० हुन अधिक शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. जेष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा चित्रकार योगेश पवार, अर्पिता पवार, भाग्यश्री सुतार, अॅड. परवेझ सुतार यांनी पार पाडल्या. मिल्ट्री बॉईज होस्टेलचे विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. 


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक