कृष्णा’च्या महिला शेतकरी ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी रवाना;'व्हीएसआय'चे पुणे येथे चार दिवसीय शिबिर...

 


कृष्णा’च्या महिला शेतकरी ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी रवाना;'व्हीएसआय'चे पुणे येथे चार दिवसीय शिबिर...

शिवनगर, दि.19 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसीय शिबीरासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या १५ महिला शेतकरी रवाना झाल्या असून, त्यांना अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे शेतकर्‍यांना दरवर्षी ऊसशेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊसाच्या प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील महिला शेतकर्‍यांना या शिबीरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पुणे येथे आयोजित शिबीरासाठी रवाना झालेल्या महिला शेतकऱ्यांना संचालक संजय पाटील, बाजीराव निकम, विलास भंडारे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, वैभव जाखले, संजय पवार, सेक्रेटरी मुकेश पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

शिबीरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

याप्रसंगी ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, कार्यलयीन अधीक्षक निलेश देशमुख, लीगल ऑफिसर विक्रम मोरे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, डॉ.विजय कुंभार आदींसह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक