'एकात्मता दौड'मध्ये धावले सैन्य दलातील जवान व शेकडो शालेय विद्यार्थी...
'एकात्मता दौड'मध्ये धावले सैन्य दलातील जवान व शेकडो शालेय विद्यार्थी...
कराड दि.15 (प्रतिनिधी) विजय दिवस समारोह समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमिवर काढण्यात आलेल्या एकात्मता दौडला कराडात मोठा प्रतिसाद मिळाला. सैन्यदलातील जवानांसह शहरातील विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी, नागरिक, महिलां ही या दौडमध्ये सहभागी झाले होते. विजय दिवस चौकात प्रारंभ झालेली दौडची संपूर्ण शहरातून येऊन स्टेडिअमवर पर्यावरणाची शपथ घेऊन सांगता झाली.
विजय दिवस समारोह समितीचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. दोन वर्षांनंतर यंदा दिमाखदार विजय दिवस समारोह निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. त्यानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्यावतीने यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सैन्य दलातील जवानांसह विद्यार्थ्यां, नागरिक व महिला ही सहभागी झाल्या. विजय दिवस चौकात सकाळी या दौडचा शूभारंभ माजी आ. आनंदराव पाटील, नि.कर्नल संभाजीराव पाटील, उद्योजक सलीम मुजावर, सह्याद्री हॉस्पीटलचे दिलीप चव्हाण, मनसेचे शहाराध्यक्ष सागर बर्गे, उद्योजक इरफान सय्यद यांच्या उपस्थित प्रारंभ करण्यात आला. यावेळी सौ. संध्या पाटील, पौर्णिमा जाधव, अरूणाचल प्रदेशची स्पेशल टीम, मराठा लाईट इंन्फट्रींचे मेजर सुयेश मिश्रा, कमांडीक ऑफीसर कश्यप कृष्णन, कॅप्टन मोहित सिंग, सुभेदार मेजर दत्ता डांगे, मिल्ट्री होस्टेलचे सहाय्यक अधिक्षक धनाजी जाधव आदींसह विजय दिवस समारोह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दौड विजय दिवस चौक, बसस्थानक, दत्त चौकातून मेन रोडने चावडी चौकापर्यंत गेली. त्यानंतर मुख्य रस्त्यावरून दौड कन्या शाळा, कृष्णा नाका येथून स्टेशन रस्ता, उपजिल्हा रुग्णालयासमोरुन विजय दिवस चौक व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर दौडची सांगता झाली. यावेळी दौडमध्ये सहभागी सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
Comments
Post a Comment