पै. रणजित मोरे यांच्या वाढदिवसाने नांदलापूर वृध्दाश्रम आनंदाने फुलले...

 


पै. रणजित मोरे यांच्या वाढदिवसाने नांदलापूर वृध्दाश्रम आनंदाने फुलले...

प्रतिनिधी-दि.14- (प्रतिनिधी) पै. रणजित मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी शंभूरत्न परिवर्तन फौंडेशन संचलित 'वृध्दाश्रम' नांदलापूर येथे भेट दिली.त्यांच्यासह दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पै. सागरदादा शिंदे व कराड शहराध्यक्ष अभिजित थोरवडे अनेक मान्यवरांसह उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीतीने नांदलापूरचा वृध्दाश्रम आनंदाने फुलून गेला.

'कर्मन्यवाधिकारस्ते मा फलेष्यू कदाचन्' ...कसल्याही फळाची अपेक्षा न करता निष्काम सेवा हे सत्य वचन. महाराष्ट्र ही साधू संतांच्या विचाराने पवित्र व पावन झालेली भूमी आहे आणि याच विचाराने प्रेरित झालेली मोठ्या मनाची माणसं म्हणजे दया करूणेचा सागर. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र निवारा लागतो. नव्हे या मूलभूत गरजा आहेत. आपण अगदी चांगल्या पद्धतीने जगतो पण आज ज्यांना खऱ्या अर्थाने या गोष्टींची गरज आहे; जे अशा गोष्टींनी वंचित आहेत अशा वृद्ध निराधारांसाठी शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनचे सचिव विकास भाऊ सूर्यवंशी धावून आले व त्यांना साहित्यिक कवी सत्यवान मंडलिक यांची मोलाची साथ लाभली. 

समाजसेवेचे व्रत उराशी बाळगून त्यांनी कराड येथे वृद्ध निराधारांची सेवा करण्याचा मानस केला व आपल्या कार्याला कोरोना काळातील गरजूंपासून सुरुवात केली. कराड तालुक्यातील नांदलापूर येथे त्यांनी वृध्द,निराधारांच्या निवाऱ्याची सोय केली. समाजातील काही तळमळीच्या सेवकांनी लोकांची जेवण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली व येथे एका वृद्धाश्रमची स्थापना झाली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेकांनी आपल्याकडून मदतीचे काम केले. अशातच दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी आर पी आय कराड शहराध्यक्ष अभिजीत थोरवडे यांच्या सहकार्यातून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष असलेले दिलदार व्यक्तिमत्व पै. रंजीतदादा मोरे साहेब यांच्या वाढदिवसाचा योग जुळून आला.

अन्नदान हे श्रेष्ठ दान मानणाऱ्या माननीय पैलवान रणजीत दादा मोरे साहेब यांनी नांदलापूर येथे भेट देऊन वृध्दांना उत्तम प्रकारच्या जेवणाची पंगत देऊन थंडीच्या दिवसात ब्लॅंकेट देऊन एक मायेची ऊब दिली. खरोखरच त्यांच्या जिव्हाळ्यातून खरं माणूसकीचं दर्शनच घडलं. त्यासाठी मनाचा मोठेपणा व दिलदार पणा असावा लागतो तो त्यांच्याकडे भरलेला दिसून आला. महाराष्ट्राच्या संस्कृतीत संत वचनांचे पाईक असलेले तरुण म्हणजे संस्काराची खानच. म्हणूनच  'सुसंगती सदा घडो' याप्रमाणे त्यांच्याबरोबर या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मा. पैलवान सागरदादा शिंदे- दादासाहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती लाभली हा दुग्ध शर्करेचा योग म्हणावा लागेल. कुस्तीचे मैदान आपल्या मर्दुमकीने गाजवणाऱ्या मा. पैलवान रंजीत मोरे साहेब व मा. पैलवान सागर दादा शिंदे यांनी समाजसेवेचा वारसा जपून आजच्या तरुण पिढीसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे व ते खरोखरच आजच्या तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. 

आरपीआय कराड शहराध्यक्ष अभिजीत थोरवडे यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे कराड तालुका अध्यक्ष निलेशभाऊ भंडारे, पंकजभाऊ शेवाळे, निखिल कुलकर्णी, गौरव पाटील, अवधूत पाटील, महेश जाधव, गणेश साबळे, रोहित संकपाळ, अक्षय तोरणे, संग्राम शिंदे, बबलू लादे, रोहित निकम, प्रथमेश खंडागळे, सतीश शिर्के (नांदलापूर ग्रामपंचायत सदस्य), महेश झुंजार, अभिजीत भोसले, सुदेश थोरवडे, सुमित कांबळे, शुभम कांबळे, अनिल साळवे, नवनाथ छत्री, बंटीभाऊ सावंत, मोहनभाऊ पाटील, शंकर फडतरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शंभूरत्न परिवर्तन फौंऊडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव विकास भाऊ सूर्यवंशी यांनी पै. रंजीत मोरे साहेबांचा सत्कार सत्यवान मंडलिक लिखित 'कल्लोळ' हे पुस्तक देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवून केला. तसेच पैलवान सागर दादा शिंदे यांचाही 'कल्लोळ' पुस्तक देऊन सत्कार केला. साहित्यिक कवी सत्यावन मंडलिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित करताना आजची नवी पिढी आपल्या विचारांची व कार्याची नक्कीच प्रेरणा घेईल असे विचार व्यक्त करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व व्याख्याते सी.डी. पवारसर, संदीप भगवान पाटील, श्री दुपटे, दादासाहेब आबा यादव सेवानिवृत्त शिक्षक, स्किल इन्फोटेक कागलचे सुरज मानेसर, विमल चुनाडे मॅडम हे उपस्थित होते. स्किल इन्फोटेक कराडचे शितल कुमार अर्धावर सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व सर्वांनी पै. रणजीत मोरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक