संविधान दिनानिमित्त कराड न्यायालयात संविधानाचे वाचन व पदयात्रा...
संविधान दिनानिमित्त कराड न्यायालयात संविधानाचे वाचन व पदयात्रा...
कराड दि.26 (प्रतिनिधी) आज संविधान दिन संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संविधान दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. कराड तालुका विधी सेवा व कराड बार असोशियनच्या वतीने आज अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
अतिरिक्त जिल्हा न्यायालय अधीक्षक न्यायाधिश एम. व्ही.भागवत साहेब, ढेकणे साहेब, तसेच कराड बार असोसिएशनच्या अध्यक्षा विद्याराणी साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यायालय आवारात संविधानाचे वाचन करण्यात आले.अॅड. अभयसिंह पाटील,अॅड.गायकवाड तसेच बार असो.चे सर्व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, वकील यामध्ये सहभागी झाले होते.सकाळी न्यायालयात संविधानाचे वाचन केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.


Comments
Post a Comment