कराडात नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन....
कराडात नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन....
कराड दि.23 (प्रतिनिधी) कराड नगरपरिषदच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नागरीकांच्यामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी व या राष्ट्रीय कार्यात नागरिकांचा सहभाग वाढवा यासाठी जिंगल स्पर्धा, शॉर्ट मुव्ही स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा व म्युरल स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी सहभागी होणार्यांनी खाली दिलेल्या लिंकचा वापर करून आजच आपली नाव नोंदणी करावयाची आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScGp5dESPZQUuxXkgzOs9hWQkiDiaLQAYtqmwnRJMV4hfydnA/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0
स्पर्धेचे विषय :- १. माझे कराड, माझी जबाबदारी २. प्लास्टिक बंदी ३. अपारंपरिक उर्जा स्त्रोत
पारितोषिक :- प्रथम क्रमांक ५०००/-, व्दितीय क्रमांक ३०००/-, तृतीय क्रमांक २०००/- व प्रमाणपत्र.
ठिकाण - 1. म्युरल स्पर्धा सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, कराड येथे घेण्यात येतील.
2-पोस्टर स्पर्धा बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० वाजेपर्यंत प्रीतीसंगम बाग, कराड येथे घेण्यात येतील.
3-जिंगल स्पर्धा, शॉर्ट मुव्ही स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा याबाबत आपली कलाकृती karad.ss2022@gmail.com Audio/Video फॉरमट मध्ये बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत पाठवावी अथवा पेन ड्राईव्ह, सीडी यामध्ये प्रत्यक्ष कराड नगरपरिषदेच्या शहर अभियान व्यवस्थापन कक्षामध्ये (बचत गट विभाग) सादर करावी.
सूचना :- १. कलाकृती ही कराड शहरामध्येच तयार करावी. २. स्पर्ध्येच्या अटी व शर्तीबाबत मुख्याधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल.
अधिक माहितीसाठी संपर्क :- सौ. दिपाली दिवटे ७४९९९९२०६६, सौ. अंजना कुंभार ७०५८६१२२८१, प्रमोद जगदाळे ९६७३९६४५९०, गणेश जाधव ९१७५०२३७३८.


Comments
Post a Comment