जिल्ह्यात उच्चांकी उचल दिल्याबद्दल शेतकरी संघटनांतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार....
जिल्ह्यात उच्चांकी उचल दिल्याबद्दल शेतकरी संघटनांतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार....
रेठरे बुद्रुक, दि.26 : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला 3000 रूपये पहिली उचल जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यात उच्चांकी उचल दिल्याबद्दल बळीराजा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला.
शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने नेहमीच उच्चांकी दर देऊन, शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाही कृष्णा कारखाना किती रुपये दर जाहीर करणार याकडे शेतकरी वर्गाचे डोळे लागले असताना, कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 3000 रुपयांची पहिली उचल देण्याचा निर्णय जाहीर केला.
शेतकऱ्यांना सर्वाधिक उचल जाहीर केल्याबद्दल बळीराजा संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष पंजाबराव पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांच्या हस्ते चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले, की डॉ. सुरेश भोसले यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. कृष्णा कारखान्याने अनेकदा ऊसदराची कोंडी फोडली आहे. यंदाही पहिली उचल 3000 रुपये देण्याचा निर्णय घेऊन, शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. अशा चांगल्या निर्णयांच्या पाठिशी बळीराजा व स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच ठामपणे उभी राहील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम खबाले, तालुकाध्यक्ष पोपट जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, कृष्णा कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे.डी मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, वैभव जाखले, सेक्रेटरी मुकेश पवार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments
Post a Comment