कराडात महात्मा फुले यांच्या पूण्यातिथी निमित्त मान्यवरांकडून अभिवादन.
कराडात महात्मा फुले यांच्या पूण्यातिथी निमित्त मान्यवरांकडून अभिवादन.
कराड दि.28 (प्रतिनिधी) ब्रिटिश सत्तेच्या कालखंडात हिंदू समाजाच्या रूढी परंपरा विरोधात अनेक सुधारकांनी आवाज उठवला त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमतीवय, बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयावर ज्योतिबा फुले यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केल केला. अशा या महान समाज सुधारकाची 132 वी पूण्यतिथी आज कराड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.येथिल बूधवार पेठेतील महात्मा फूले यांच्या पूतळ्यास पूष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले, काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष झाकीर पठाण, समता सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष आनंदराव लादे, कराड नगर परिषदेचे आरोग्य अभियंता आर डी भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंद खवळे, वरिष्ठ मुकदम मारुती काटरे, सुरेश शिंदे, माणिक बनकर, रमेश वायदंडे संतोष वायदंडे, महात्मा फूले उत्सव समितीचे सदस्य, नियोजन करणारे विनोद भोसले,
नागरिक तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी यावेळी महात्मा फूले यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment