मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराड दौऱ्यात घेराओ घालण्यात येणार- दलित महासंघाचा इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराड दौऱ्यात घेराओ घालण्यात येणार- दलित महासंघाचा इशारा...
कराड 23 (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि.२५ रोजी कराड दौऱ्यात दलित महासंघाचे वतिने 'गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत तसेच २०२२पर्यंतची गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम करण्यात यावीत,'या मागणीसाठी घेराओ घालण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी दिली आहे.
या आंदोलनामध्ये संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांचेसह अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.याचबरोबर सर्व अर्थीक विकास महामंडळाची कर्जमाफी करण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांना करण्यात येणार आहे.
सदरचे घेराओ आंदोलन यशस्वी करण्यासाठी दलित महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राम दाभाडे, उपाध्यक्ष सुरज घोलप, खटाव तालुका प्रभारी शंकर तुपे, कराड तालुका अध्यक्ष जयवंत सकटे ,सुहास पिसाळ, सुर्यकांत काळे आदि परिश्रम घेत आहेत.


Comments
Post a Comment