सह्याद्रीच्या वाहनतळावर ट्रॅक्टरखाली सापडून तरुणाचा मृत्यू;कारखान्यावर तणाव...

 


सह्याद्रीच्या वाहनतळावर ट्रॅक्टरखाली सापडून तरुणाचा मृत्यू;कारखान्यावर तणाव...

कराड दि.27(प्रतिनिधी) - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वाहनतळावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर सकाळी ऊस वाहने आत जाण्याच्या गेटवर व वाहन तळावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. ट्रॅक्टर चालक,मालक तसेच मृताच्या नातेवाईंकानी यावेळी गर्दी केली होती. अविनाश जाधव (वय 22) रा. सुपने ता. कराड असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती नूसार, सह्याद्री कारखाना कार्यस्थळावरील वाहन तळावर आज सकाळी भाऊसाहेब गायकवाड रा. जालना यांच्या मालकीचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली (एम. एच. 21 बी. व्ही. 1762) एक जण सापडल्याचे निदर्शनास आले.उपस्थित चालक मालक यांनी याबाबत कारखाना प्रशासनास तसेच पोलिसांना माहिती दिली.दरम्यान या घटनेनंतर सबंधित ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन गायब झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान या घटनेची नोंद उंब्रज पोलिसात झाली असुन नेमकी घटना कशी घडली याबाबत घटनास्थळावर वेगवेगळी चर्चा सूरू होती.सबंधित मृत टॅक्ट्रर चालक असल्याचे तसेच वाहनतळावर रात्री त्याच्यासोबत मारीमारीची घटना घडल्याचे काही जण बोलताना दिसत होते.तर तो टॅक्ट्रर ट्राॅलीखाली झोपला होता नंतर ही घटना घडल्याचे काही जण सांगत होते.

कारखाना प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे अविनाशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत मृतदेह त्याब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. हा घात की अपघात याची चौकशी करून दोषिंना अटक करावी अशी मागणी नातेवाईकांकडून यावेळी करण्यात आली. घटनास्थळी तळबीड पोलीस ठाण्याच्या स.पो.नि जयश्री पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी भेट देत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर तणाव निवळला व मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक