कराडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन...
कराडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन...
कराड दि.24-(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कराड दौऱ्यावर येत असून कराड शहर व परिसरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री समाधी स्थळावर श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी उपस्थित राहणार असून त्यानंतर शहरातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
कराड विमानतळावर सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमन होणार आहे. त्यानंतर ते प्रीतीसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बैल बाजार मैदान येथे आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित राहणार आहेत. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर भेदा चौकात छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या भूमिपूजना करणार आहेत. त्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून झालेल्या शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासह नविन शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरील कार्यक्रमानंतर कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट देणार आहेत. त्यानंतर ते कराडात मेनरोडला आयोजित बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.



Comments
Post a Comment