कराडात प्लास्टीक निर्मुलन मोहिमे अंतर्गत दोन व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई....
प्लास्टीक निर्मुलन मोहिमे अंतर्गत कराडात दोन व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई....
कराड दि.23 (प्रतिनिधी) एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तुंच्या बंदीची कडक अंमलबजावणी कराडात सूरू आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सूचनेनूसार शहरात आरोग्य विभाग व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत बाजारपेठेतील आर के लिनन कलेक्शन व राजलक्ष्मी रेडिमेड कलेक्शन या दोन दूकांनावर प्रत्येकी पाच हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर बंदी असलेले व प्लास्टीकचा वापर असलेले 55 किलोचे साहित्य जप्त करण्यात आले.यामध्ये प्लास्टीक चमचे, स्ट्राॅ, डिश तसेच प्लास्टीकचे आवरण असलेल्या पत्रावळ्यांचा समावेश आहे.
सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यास बंदी केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी कराड नगर परिषदेने सुरू ठेवली आहे. या अंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने बाजारपेठेत विविध ठिकाणी प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. यावेळी काही दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन दुकानात प्रतिबंध करण्यात आलेले प्लास्टिकच्या वस्तू आढळून आल्याने त्या दोन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करीत प्लास्टिकच्या वस्तू जप्त करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.तसेच नगरपरिषदेच्यावतीने दूकानदारांना कापडी व पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
या प्लास्टिक निर्मूलन मोहिमेत कराड नगर परिषदेचे आरोग्य अभियंता आर डी भालदार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सातारा फिल्ड आॅफिसर ए. एस.जगदाळे तसेच वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, रामचंद्र भिसे, नारायण कांबळे, मनोज गायकवाड, शक्ती कांबळे सहभागी झाले होते.


Comments
Post a Comment