ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज पारंपारिक पध्दतीने स्विकारण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश.....
कराडच्या प्रशासकीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी....
ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज पारंपारिक पध्दतीने स्विकारण्याचे निवडणू आयोगाचे आदेश.....
कराड दि.1 (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत या निवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे आदेश पारित केले आहेत. याशिवाय उद्या 2 डिसेंबर अखेरच्या दिवशी अर्ज स्वीकारण्याची वेळ साडेपाच पर्यंत वाढवण्यात आल्याचे ही आदेशात म्हटले आहे.उमेदवारी अर्ज भरण्यापासून एक ही उमेदवार वंचित राहू नये यासाठी आयोगाने आॅफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याचे आदेश निवडणूक अधिकार्यांना दिले आहेत.
गेली दोन दिवस ऑनलाइन उमेदवारी अर्ज सादर करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे भरपूर वेळ वाया जात असल्याचे तक्रारी सुरू होत्या. आज सकाळी राज्य निवडणूक आयोगाने तातडीने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून उमेदवारी अर्ज पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन स्वीकारण्यात स्वीकारण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. त्याच्या अंमलबजावणी ही सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून उद्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात 319 ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे यामध्ये जावळी तालुक्यातील 15, कराड तालुक्यातील 44, खंडाळा तालुक्यातील 2, खटाव तालुक्यातील 15, कोरेगाव तालुक्यातील 51, महाबळेश्वर तालुक्यातील 6, माण तालुक्यातील 30, पाटण तालुक्यातील 86, फलटण तालुक्यातील 24, सातारा तालुक्यातील 39 तर वाई तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
Comments
Post a Comment