कराड तालुक्यातील जुळेवाडीत मित्राचा खून, आरोपीस 24 तासात अटक;खूनाचा गून्हा उघडकीस...
जूळेवाडीत मित्राचा खून करुन पळून गेलेल्या आरोपीस 24 तासात अटक;खूनाचा गून्हा उघडकीस...
कराड दि.27 (प्रतिनिधी) कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे काल रात्री मित्राचा खून करून करून पळून गेलेल्या जुळेवाडी येथीलच एकास कराड तालुका पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. त्याबाबत कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास पो.नि.आनंदराव खोबरे हे करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जुळेवाडी तालुका कराड येथे पुजारी चौकात राजवर्धन महादेव पाटील (वय 24) याच्यावर गावातील विजय बाबुराव काशीद यांनी अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने जीव मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. या हल्ल्यात राजवर्धन गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान कराड तालुका पोलिसात सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कराड तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, पोलीस हवालदार कुलकर्णी, लावंड तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोलीस नाईक सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम तसेच पोलीस हवालदार कांबळे, अमोल पवार, सचिन गुरव, संजय काटे यांची वेगवेगळे पथके तपासासाठी तयार करण्यात आली. या दरम्यान या पथकाने विविध ठिकाणी चौकशी करून आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला.
सदर आरोपीचा शोध घेत असताना संबंधित तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शेरे तालुका कराड येथे हल्ला करून पळून गेलेला आरोपी विजय बाबासो काशीद खोपकर (वय 22) रा. जुळेवाडी असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी त्यास तात्काळ ताब्यात घेऊन त्यानंतर केलेल्या तपासात विजयाने खून केल्याची कबुली दिली असून कुणाची नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, पोलीस हवालदार कुलकर्णी, लावंड तसेच कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोलीस नाईक सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम तसेच पोलीस हवालदार कांबळे, अमोल पवार, सचिन गुरव, संजय काटे यांनी आरोपीस 24 तासाच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणून चांगली कामगिरी केली आहे.


Comments
Post a Comment