ग्रामपंचायत निवडणूक;सरपंच पदासाठी 24, तर सदस्य पदासाठी 89 अर्ज दाखल...
कराड तालुका ग्रामपंचायत निवडणूक;सरपंच पदासाठी 24, तर सदस्य पदासाठी 89 अर्ज दाखल...
कराड, दि. 29 (प्रतिनिधी) - कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. आज दूसर्या दिवशी सरपंच पदासाठी 24 अर्ज दाखल झाले असुन सदस्य पदासाठी एकूण 89 अर्ज दाखल झाले आहेत.
दिवसभरात सरपंच पदासाठी दाखल झालेले अर्ज- तारूख 1, शामगाव 1, आणे 3, कुसुर 2, कालगाव 1, मनू 1, पश्चिम सुपने 1,जूळेवाडी 3, कासारशिरंबे 4, किवळ 1, आटके 2, चरेगाव 1, तळबीड 1, वडगाव हवेली 2 असे 24 अर्ज सरपंच पदास्ठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दाखल झालेले अर्ज-हवेलवाडी 3 , तारूख 1 , दुशेरे 1, हिंगनोळे 8, अंतवडी 1, शामगाव 2, डेळेवाडी 1, आणे 11, कुसूर 3, पाडळी (हेळगाव) 1, कालगाव 2, मनु 1, कोरेगाव 2, रेटरे खुर्द 2, जुळेवाडी 4, कासारशिरंबे 5, सुपने 2, किवळ 3, आटके 20, चरेगाव 2, तळबीड 14 असे आज 89 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.



Comments
Post a Comment