कराड तालुक्यातील 14 गावातून एक ही उमेदवारी अर्ज दाखल नाही....

 


कराड तालुका ग्रामपंचायत निवडणूक;सरपंच पदासाठी 14, तर सदस्य पदासाठी 84 अर्ज दाखल...

कराड, दि. 30 (प्रतिनिधी) - कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत आज तिसर्‍या दिवशी सरपंच पदासाठी 14 अर्ज दाखल झाले असुन सदस्य पदासाठी एकूण 84 अर्ज दाखल झाले आहेत.14 गावात अजून ही सरंपच व सदस्य पदासाठी एक ही अर्ज दाखल झालेला नाही 

दिवसभरात सरपंच पदासाठी दाखल झालेले अर्ज तर कंसात आज पर्यंत दाखल अर्ज- तारूख 1 (2), शामगाव 1 (2), दुशेरे 1 (1), गोंदी 2 (2) आणे 1 (5), हिंगनोळे 2 (3), घोलपवाडी 1 (1), कुसुर 0 (2), अंधारवाडी 1 (1), कालगाव 1 (1), मनू 1 (2), कोरेगाव 1 (2), गणेशवाडी 1 (1), पश्चिम सुपने 1 (1), रेटरे खुर्द 1 (1), जूळेवाडी 0 (3), कासारशिरंबे 0 (4), किवळ 0 (1), आटके 1 (5), चरेगाव 0 (1), तळबीड 0 (5), वडगाव हवेली 0 (3) असे  14 (49) अर्ज सरपंच पदास्ठी दाखल झाले आहेत.

दिवसभरात ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दाखल झालेले अर्ज तर कंसात आज पर्यंत दाखल अर्ज-हनुमानवाडी 3 (3), हवेलवाडी 2 (7) , तारूख 1 (1) , दुशेरे 1 (2), गोंदी 1 (1), हिंगनोळे 9 (16), साबळवाडी 3 (3), अंतवडी 3 (4), शामगाव 4 (6), भांबे 5 (5), डेळेवाडी 4 (5), आणे 3 (21), कुसूर 2 (5), पाडळी (हेळगाव) 2 (3), कालगाव 0 (2), मनु 7 (8), कोरेगाव 4 (6), पश्चिम सुपने 1 (1), रेटरे खुर्द 2 (4), जुळेवाडी 5 (9), कासारशिरंबे 3 (8), सुपने 2 (4), किवळ 1 (4), आटके 2 (26), चरेगाव 2 (4),  तळबीड 5 (20), वडगाव हवेली 5 (9)  असे आज 84 (191) अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

जुने कवठे, वनवासमाची,विजयनगर, ओंडोशी,चोरजवाडी, धावरवाडी, घराळवाडी, हनुमंतवाडी, वानरवाडी, चिंचणी,मस्करवाडी, आरेवाडी, कळंत्रेवाडी, येळगाव या गावात अजून ही सरंपच व सदस्य पदासाठी एक ही अर्ज दाखल झालेला नाही 

निवडणूक कार्यक्रम ----सोमवार दि. 28 नोव्हेंबर ते शुक्रवार दि. 2 डिसेंबर 2022 सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार तर अर्जाची छाननी सोमवार 5 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. बुधवार 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक