आ. बाळासाहेब पाटील यांनी सपत्नीक घेतले खंडोबा म्हाळसाकांतचे दर्शन....
आ. बाळासाहेब पाटील यांनी सपत्नीक घेतले खंडोबा म्हाळसाकांतचे दर्शन....
कराड दि.24- दिपावली व लक्ष्मीपूजनच्या शुभमुहूर्तावर राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी पत्नी सौ.जयमाला पाटील व चिरंजीव जशराज पाटील(बाबा) यांच्यासमवेत पाल ता.कराड येथील श्री खंडोबा-म्हाळसाकांताचे दर्शन घेतले, यावेळी त्यांच्या उपस्थितीत चैत्यन्यपूर्ण वातावरणात सकाळची आरती संपन्न झाली.
याप्रसंगी खंडोबा म्हाळसाकांत देवस्थान कमिटीचे प्रमुख मानकरी देवराजदादा पाटील, सह्याद्रि कारखान्याचे संचालक सर्जेराव खंडाईत, माजी संचालक भास्करराव गोरे, उध्दवराव फाळके यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment