कराडात 'आनंदाचा शिधा'चे आॅफलाईन वाटप;लाभार्थ्यांची दिवाळी झाली गोड...


'आनंदाचा शिधा'चे वाटप करताना खरेदी विक्री संघाच्या स्वस्त धान्य दूकानातील कर्मचारी....

कराडात 'आनंदाचा शिधा'चे आॅफलाईन वाटप;लाभार्थ्यांची दिवाळी झाली गोड...

कराड दि.23-(प्रतिनिधी)  राज्य सरकारने दिवाळीनिमित्त प्राधान्यक्रम शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानांतून आनंदाचा शिधा म्हणून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट दिले असून कराड शहरातील सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.प्रारंभी आॅनलाईन पध्दतीने पाॅजमशिनला विलंब लागत असल्याने किट वाटपाला विलंब लागत असल्याने प्रशासनाने आॅफलाईन पध्दतीने या किटचे वाटप सूरू केले आहे.अनेक  गरजूनी आज याचा लाभ घेतलेला आहे. 

आनंदाचा शिधा संपूर्ण राज्यात वितरीत करण्यात आला.मात्र वेळेअभावी अनेक ठिकाणी शिधा पोहचण्यास विलंब झाला.कराडात हा शिधा पोहच झाल्यानंतर स्वस्त धान्य दूकानदारांची थोडी कसरत झाली.नियमित धान्य वाटप व शिधा वाटप करताना सबंधित लाभार्थ्याचा दोन वेळा थंब घ्यावा लागला.मात्र सर्वर संथ झाल्याने विलंब होऊ लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.याची दखल तात्काळ पूरवठा विभागाने घेतली व शिधा वाटप आॅफलाईन पध्दतीने करण्याचे आदेश दिल्याने काल व आज मोठ्या प्रमाणात शिधा वाटप करण्यात आल्याचे पूरवठा अधिकारी महादेव आष्टेकर यांनी सांगितले.

'आनंदाचा शिधा' या किट मधील चार वस्तू साधारणता बाजारपेठेत विकत घ्यायच्या झाल्यास किमान चारशे रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र राज्य शासनाने हा शिधा केवळ शंभर रुपयात दिल्याने आम्हाला दिवाळीचा आनंद घेता आल्याचे सखाराम वाघमारे या लाभार्थ्यांनै सांगितले. आज बाजारपेठेत दीपावलीसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू महागल्या आहेत. गरीब गरजूंना या वस्तू बाजारपेठेत घेताना मोठी रक्कम मोजावी लागली असती. मात्र 'आनंदाचा शिधा' च्या माध्यमातून या वस्तू आम्हाला केवळ शंभर रुपयात मिळाल्याने मोठा आधार मिळाल्याचे वाघमारे यांनी सांगितले.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक