कराडात वीस एकरातील ऊस जळून खाक;अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न....
कराडात वीस एकरातील ऊस जळून खाक;अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न....
कराड दि.23-(प्रतिनिधी) येथील बैल बाजार ते मलकापूर रोड दरम्यान असणाऱ्या प्रीतिसंगम मंगल कार्यालयाच्या पाठीमागील सुमारे वीस एकरातील ऊस शेतीला लागलेल्या आगीमुळे मोठा नुकसान झाला आहे. दुपारी तीन वाजता ही आग लागल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले व तात्काळ अग्निशामक दलास त्यांनी संपर्क केल्याने कराड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ऊस क्षेत्रापर्यंत गाडी जाण्यासाठीचा मार्ग नसल्याने उसाच्या मध्यभागातील आग विझवता आली नाही.
मलकापूर गोळेश्वर हद्दीत हे शेती असून दुपारी आग लागल्यानंतर लोकांनी तात्काळ पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र जळून खाक झाले. चार ते पाच शेतकऱ्यांच्या या ऊस शेतीला आग लागल्याने मोठा नुकसान झाला आहे. अजूनही आग सुरूच असून शेतकरी आग विझवण्याचा शर्तीचा प्रयत्न करीत आहेत. या परिसरात गोळेश्वर हद्दीपर्यंत ऊस क्षेत्र आहे.लहान मुलांनी फटाके फोडल्याने आग लागल्याची शक्यता तेथिल नागरिकांनी व्यक्त केली आहे.दरम्यान अद्याप ऊसाचे गाळप सूरू नसल्याने या जळीत उसाचे मोठं नूकसान होणार असल्याने उस शेतमालक चिंतेत आहेत.
Comments
Post a Comment