कराडात मधुपर्व प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी भेट देऊन कष्टकर्यांचा सन्मान...
कराडात मधुपर्व प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी भेट देऊन कष्टकर्यांचा सन्मान...
कराड दि.23(प्रतिनिधी) दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील कष्टकऱ्यांची दिवाळी आज कराडच्या मधुपर्व प्रतिष्ठानच्या वतीने गोड करण्यात आली. शहरातील सर्व गॅस वितरक कर्मचारी, आशा वर्कर, कराड नगर परिषदेच्या घंटागाडीवर काम करणारे कर्मचारी तसेच महिला बांधकाम कामगार यांना प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भानुदास वास्के, उपाध्यक्ष दत्तात्रय तारळेकर, कार्याध्यक्ष माणिक बनकर, सतीश लोखंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शाळा क्रमांक 9 मध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष साईनाम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शीरिष शंभुस यांनी आशा वर्कर यांनी कोविड काळात केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक केले तसेच कराड नगरपालिकेतील घंटागाडी कर्मचारी तसेच शहरात गॅस वितरण करणारे कर्मचारी यांच्या देखील कष्टाचे यावेळी उपस्थितांनी कौतुक करुन उपस्थित मान्यवरांनी या सर्व कष्टकरी कामगारांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक बनकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अर्जुन वासके यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन अरबाज मुतवल्ली, प्रवीण नाथ, सिद्धांत वास्के, प्रथमेश वास्के यांनी यशस्वी केले.



Comments
Post a Comment