रिमांड होम मधील अनाथ मूलांची दिवाळी उत्साहात;दादा शिंगण यांचा उपक्रम.....
रिमांड होम मधील अनाथ मूलांची दिवाळी उत्साहात;दादा शिंगण यांचा उपक्रम.....
कराड दि.24 (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते व मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण यांच्या पुढाकाराने आज येथील रिमांड होम मधील अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी रणजीत पाटील यांच्या हस्ते या मुलांना कपडे व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुलांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. तसेच मलकापूर मदरशातील मुलांनी अनाथ मुलांसोबत फराळाचा आस्वाद घेतला.
येथील रिमाइंड होम मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण हे आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने रिमांड होम मधील अनाथ मुलांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात. हे 22 वर्ष आहे. सातत्याने या अनाथ मुलांना कपडे भेटवस्तू, दिवाळी फराळ देऊन त्यांचा सन्मान करतात. सामाजिक बांधिलकी जोपासत गेले अनेक वर्षे हा उपक्रम दादा शिंगण राबवत आले आहेत. क्रांतिवीर माधवराव जाधव बाल निरीक्षण गृहात असणारी ही अनाथ मुले दादा शिंगण यांनी केलेल्या सन्मानाने भारावून जातात.
दीपावलीच्या आजच्या या उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण व त्यांच्या सहकारी मित्र रिमांड होममध्ये विविध उपक्रम राबवत असतात. आज दिवाळीच्या निमित्ताने मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या मदतीने कृष्णा बँकेचे कार्यकारी अधिकारी कापसे साहेब तसेच रिमांड होमचे संचालक राजेंद्र पवार, अजिंक्य पवार, मोहन पाटील तसेच रिमांडोम चे सर्व शिक्षक कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment