मुथूट फिनकाॅर्पच्या नेत्र तपासणी शिबिरास कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

 शिबिरात डोळ्यांची तपासणी करताना डाॅ.योगिता पाटील....

मुथूट फिनकाॅर्पच्या नेत्र तपासणी शिबिरास कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

कराड दि.23 (प्रतिनिधी) मुथूट फिनकाॅर्प लिमिटेडच्या कराड शाखा आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास कराडकर नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला कोल्हापूर नाका येथील संजीवन हॉस्पिटलच्या मदतीचे बळ मिळाले. या नेत्र तपासणी शिबिरात शहरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

मुथूट फिनकाॅर्पच्या कराड शाखेत डाॅ.योगिता पाटील यांचे स्वागत करताना शाखाप्रमुख जास्मिन काझी समवेत कल्याणी माने...

मुथूट फिनकाॅर्प लिमिटेड (मुथूट ब्ल्यू) च्या कराड शाखेमार्फत ग्राहकांच्या सेवेबरोबर विविध समाज उपयोगी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. याच भावनेतून कोल्हापूर नाका येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये डाॅ. योगिता पाटील यांच्या सहकार्याने या मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संस्थेमार्फत असे उपक्रम नेहमीच राबवले जातील असा विश्वास मुथूट फिनकाॅर्प कराड शाखाप्रमुख जास्मिन काझी यांनी यावेळी व्यक्त केला.


समाजात व्यवसाय अथवा विविध संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासली जाणे गरजेचे असून मुथूट फिनकाॅर्पने असे उपक्रम राबवावेत त्यासाठी संजीवनी हॉस्पिटल नेहमीच सहकार्य करेल असे आश्वासन डॉ. योगिता पाटील यांनी यावेळी दिले.


मुथूट फिनकाॅर्पने घेतलेल्या या मोफत नेत्र तपासणी शिबिरात डॉ. योगिता पाटील यांनी अत्याधुनिक पद्धतीने सहभागी नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून सर्वांना आपल्या डोळ्यांची कशाप्रकारे काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन केले. यावेळी अनेक नागरिकांनी मुथूट फिनकाॅर्प तसेच संजीवन हॉस्पिटलचे आभार मानले.

मुथूट फिनकाॅर्पच्यावतीने कराड शाखाप्रमुख जास्मिन काझी यांनी यावेळी डॉ. योगिता पाटील यांचे संस्थेत स्वागत करीत सत्कार केला. शाखेतील आशिकेश मोरे, संदीप नलवडे यांनीही शिबिरात मदत करणाऱ्या हॉस्पिटल मधील सर्वांचे स्वागत केले तर कल्याणी माने यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक