सातारा जिल्ह्यात आज कोरोना बाधितांची पून्हा मोठी वाढ;सक्रीय रूग्णसंख्येत वाढ.........
सातारा जिल्ह्यात आज 14 बाधिताची वाढ ...
कराड दि.22 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 14 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 55 झाली असून सध्या 6 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.
सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0, कराड-0, खंडाळा- 0, खटाव- 0, कोरेगाव-2, माण-0, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-0, सातारा-7, वाई-3, इतर 1 असे 14 बाधितांची वाढ झाली आहे.
नमूने-चाचणी-226 (एकूण-26 लाख 21 हजार 507)
आज बाधित वाढ- 14 (एकूण-2 लाख 80 हजार 610)
आज कोरोनामुक्त- 8 (एकूण-2 लाख 73 हजार 817)
आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 719)
उपचारार्थ रूग्ण-55
गंभीर रुग्ण--0
रूग्णालयात उपचार -6
सातारा जिल्ह्यात आज 10 जनावरांचा मृत्यु झाला .....
सातारा जिल्ह्याकडे 2 लाख 81 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून यांमधुन आजअखेर बाधित क्षेत्रातील गावांमध्ये 1 लाख 11 हजार 928 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमध्ये 18 हजार 325 असे एकूण 1 लाख 30 हजार 253 पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात 9 तालुक्यातील 67 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 478 व 62 बैल असे एकूण 540 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.आज जिल्हयामध्ये 10 जनावरांचा मृत्यु झाला असून आजअखेर 76 गाई व 6 बैल असे एकूण 82 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील एकूण 407 गावातील 1 लाख 35 हजार 763 पशुधनास मोफत लसीकरण करण्यात येत आहे.
पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.

Comments
Post a Comment