कराडात ज्यांच्या घरात डेंग्यूच्या आळ्या सापडल्यास 500 रूपयांची दंडात्मक कारवाई होणार.....
| डेंग्यू,चिकनगूनिया उपयोजनेत शहर परिसरात औषध फवारणी करताना नपा कर्माचारी... |
कराडात ज्यांच्या घरात डेंग्यूच्या आळ्या सापडल्यास 500 रूपयांची दंडात्मक कारवाई होणार.....
कराड दि.21 (प्रतिनिधी) कराड शहरात डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने नियमित कीटकनाशक फवारणी सुरू ठेवली असून अनेक ठिकाणी कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सूचनेनुसार आरोग्य अभियंता आर डी भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच ग्रीनी टीम घरोघरी डेंगू बाबत जनजागृती करीत आहेत. अशा परिस्थितीत कराड शहरात ज्यांच्या घरी डेंगूच्या आळ्या सापडतील त्यांच्यावर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कराड नगर परिषदेने नागरिकांसाठी कचरा गाड्या तसेच स्पीकर वरून डेंगू व चिकनगुनिया संदर्भात सूचना व जनजागृती करण्यास यापूर्वी सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काही सूचना नागरिकांना केल्या असून त्या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या घरात झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा तसेच पाण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस घासून पुसून कोरडी करावीत, घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावावे, डासांची पैदास होणारी ठिकाणे व भंगार साहित्याची विल्हेवाट लावावी, डेंगू व चिकनगूनिया रुग्णांची संपूर्ण माहिती कराड नगरपालिकेत तात्काळ द्यावी असे आवाहन ही करण्यात येत आहे.
सध्या लंपी त्वचा रोगाचा संसर्ग वाढल्याने त्या अनुषंगाने ही कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून शहरात असणारे गोपालन केंद्र तसेच जनावरांचे गोठे जनावर बांधण्यात येणारी ठिकाणे व परिसरात औषधांची फवारणी सुरू केली आहे.



Comments
Post a Comment