‘टीम वर्क’ ही यशाची गुरुकिल्ली : डॉ. लिआना साने
कराड : कृष्णा अभिमत विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर. बाजूस डावीकडून विक्रम शिंदे, डॉ. लिआना साने, अस्मिता देशपांडे....
‘टीम वर्क’ ही यशाची गुरुकिल्ली : डॉ. लिआना साने
कराड, दि.24- ‘टीम वर्क’ ही यशाची गुरुकिल्ली असून, ‘टीम वर्क’मुळे संस्थेबरोबरच कर्मचाऱ्यांचाही विकास होत असतो, असे प्रतिपादन वेधिक आय.ए.एस. अकॅडमीच्या विभागीय संचालिका डॉ. लिआना साने यांनी केले. कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या मनुष्यबळ विभागाच्यावतीने आयोजित 'टीम वर्क' या विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे व मुनष्यबळ व्यवस्थापक विक्रम शिंदे प्रमुख उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. साने म्हणाल्या, की कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी ‘टीम वर्क’ला सर्वाधिक महत्त्व असते. त्याशिवाय ध्येय गाठता येत नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आपल्या कामाचे तंत्र विकसित केले, तरच संस्थेची प्रगती होत असते.
सहाय्यक मुनष्यबळ व्यवस्थापक चेतन गोरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सहाय्यक मुनष्यबळ व्यवस्थापक राजेश जांभळे यांनी आभार मानले.


Comments
Post a Comment