जिल्ह्याची शांततेची परंपरा आबाधित ठेवत उत्सव साजरा करावा;खा.श्रीनिवास पाटील.
जिल्ह्याची शांततेची परंपरा आबाधित ठेवत उत्सव साजरा करावा;खा.श्रीनिवास पाटील....
कराड दि.23 (प्रतिनिधी) गणेश उत्सव काळात यापूर्वीही सातारा जिल्ह्यात विशेष करून कराड शहरात शांततामय वातावरणात उत्सव पार पडत असतो. हीच शांततेची परंपरा गणेशोत्सव काळात जोपासण्यात यावी असे आव्हान खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
गणेशोत्सव अनुषंगाने आयोजित शांतता कमिटी बैठकीत खा.पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजयकूमार बन्सल, अप्पर पो.अधिक्षक अजित बोर्हाडे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार विजय पवार, पो.उपविभागीय अधिकारी डाॅ.रणजीत पाटील, तालुका पो.निरिक्षक आनंदराव खोबरे,पो.नि.बी आर पाटील, नगरपरिषद, महावितरण, महसूल, टेंभू प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी, सर्व आजी माजी नगरसेवक, सरपंच, गणेश मंडळांचे सर्व पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.
दोन वर्ष कोरोना काळ असल्याने सातारा जिल्ह्यात अनेक उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र यावर्षी हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत मात्र आपल्या जिल्ह्याला शांततेची परंपरा आहे. आपल्या जिल्ह्यात प्रत्येक उत्सवात शांतता अबाधित ठेवली जाते. हीच शांतता याही उत्सवात अबाधित ठेवण्याची गरज असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.
या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस प्रशासनाकडे आलेल्या सूचना या पाहिल्या जातील. त्या अनुषंगाने प्रत्येक विभागाला सूचना दिल्या जातील. त्यामुळे नागरिकांनी हा उत्सव साजरा करताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियय व अटींचे पालन करावे. तसेच आणखी काही सूचना असल्यास त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कराव्यात असे आव्हान यावेळी जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांनी केले.
कोरोनानंतर हा उत्सव मोठ्या प्रमाणात नक्कीच साजरा झाला पाहिजे.तो आपण साजरा करताना दक्षता घेणे गरजेचे आहे.नियमांचे पालन करुन गणेश उत्सव साजरा व्हावा. उत्सव काळात होणारी गर्दी, रस्ते, वहातुक याबद्दल सबंधितांना विभागाला सूचना दिल्या जातील. आपल्या शहरात तडीपार, हद्दपार असलेल्या गून्हेगारांची माहिती गणेश मंडाळानी पोलिसांना देऊन सहकार्य करावे. जाहिरात, होर्डिंग, बॅनरवरील संदेश भान ठेऊन असावेत जेणेकरुन कूणाच्या भावना दूखावणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी. ऊत्सव परवाने आॅफलाईन स्विकारले जातील. ध्वनीपेक्षावरील आवाजाची मर्यादा पाळवी. शासनाने उत्सवकाळात चार दिवस बारा वाजेपर्यंत परवाणगी दिलेली आहेच, तसेच देखाव्यासाठी एक तासा जादा देण्यात येईल. विसर्जन मिरवणूकीत रात्री बारानंतर कोणतेही वाद्य वाजवता कामा नये. अशा विविध सूचना जिल्हा पोलिस प्रमुख अजयकूमार बन्सल यांनी यावेळी केल्या.
गणेश ऊत्सवात देखावे पाहण्यासाठी वेळ वाढवून मिळावी, रस्त्यातील खड्डे भरण्यात यावेत, मोठे बॅनर लावण्यात येऊ नये,मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करावेत तसेच शहरातील भटक्या कूत्र्यांचा बंदोबस्त करावा, गणेश मंडळना एमएसईबीने उत्सवकाळात विज कनेक्शन मोफत देण्यात यावे अशा विविध मागण्या शांतता कमिटी बैठकीत करण्यात आल्या.
दरम्यान या बैठकीत सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी प्रथमच कराडला आल्याने त्यांचा कराड शहरातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, फारूक पटवेकर, विनायक पावस्कर हनुमंत पवार, स्मिता हुलवान, नीलमताई येडगे, नितीन काशीद शिवाजी पवार, सागर बर्गे,प्रशांत यादव उपस्थित होते.
बैठकीत वरीष्ठ पो.नि.बी आर पाटील यांनी प्रास्थाविक केले तर तहसिलदार विजय पवार यांनी आभार मानले.रत्नाकर शानभाग यांनी सूत्रसंचलन केले.

Comments
Post a Comment