सलीम मुजावर यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर पदी निवड...
सलीम मुजावर यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर पदी निवड...
कराड दि.23 (प्रतिनिधी) येथिल सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक व रोटरी क्लब आॅफ मलकापूरचे अध्यक्ष सलीम मुजावर यांची 2023-24 या वर्षा करीता रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर या पदासाठी निवड करण्यात आली आहे. मुजावर यांनी त्यांच्या अध्यपदाच्या कार्यकाळात विविध सामाजिक, शैक्षिणिक उपक्रम राबवले आहेत.अनेक वंचितांना मदतकार्य करीत सामाजिक बांधिलिकी जोपासली आहे.त्यांच्या या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
समाजातील गरजू व्यक्तिस वैद्यकीय, जीवनोपयोगी वस्तू तसेच प्रत्येक गरजूस 100% मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून सलीम मुजावर ओळखले जातात.सलीम मुजावर हे रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे सन 2020-21चे अध्यक्ष व बेस्ट प्रेसिडेंट चषक विजेते आहेत. रो. मुजावर यांची नुकतीच असिस्टंट गव्हर्नर या पदासाठी सण 2023 24 या वर्षासाठी निवड करण्यात आली असुन त्याबद्दल त्यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत असून त्यांना विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रोटरी क्लबचे काम करीत असताना आपला परिवार म्हणून काम केले.कोरोना काळात गरजूनां अन्नधान्य वाटप करीत अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बाधिंलिकी जोपासताना वंचितांना, निराधाराना, गोर गरीबांना मदत केल्याचे सलीम मुजावर यांनी सांगितले

Comments
Post a Comment