जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला;कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सूरूच......
जिल्ह्यात पावसाची उघडीप;कोयना धरणात 97.39 टीएमसी साठा....
कराड दि. 23 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्ह्यात ही पावसाने आज उघडीप दिली आहे. कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले असून धरणाच्या पायथागृहातुन सध्या एकूण 2 हजार 100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज दिवसभरात कोयना नवजा परिसरात केवळ 21 मि.मि. पाऊस झाला.
सध्या कोयना धरणात 16 हजार 915 क्यूसेक आवक होत आहे. धरणाच्या पायथा गृहातून 2 हजार 100 क्युसेक विसर्ग सूरू आहे.धरणात दिवसभरात 00.53 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या कोयना धरणात 97.39 टीएमसी पाणीसाठा असून धरण 92.54% टक्के भरले आहे.
आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला होता. कोयना नवजा परिसरात 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 8 मि.मी तर नवजा येथे 13 मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 18 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे.
जिल्ह्यात सध्या कोयना धरणातून 2 हजार 100 तर धोम धरणातून 1 हजार 95, कण्हेर धरणातून 550, उरमोडी धरणातून 500, धोम बलकवडी धरणातून 890, तारळी मधून 424 तर वीर धरणातून 5 हजार 287 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Comments
Post a Comment