कोयना धरण भरणार का? पाणलोट क्षेत्रात पावसाची दिवसभर विश्रांती.........
कराड दि.26 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ बारा मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गत महिनाभरातील पावसाची ही सर्वात कमि नोंद आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 0 तर नऊजा येथे 12 रा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला केवळ 6 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे कोयना धरणात गतवर्षाच्या तुलनेत 25% टक्के पाणीसाठा कमी आहे.
सध्या कोयना धरणात 64.10 टीएमसी पाणीसाठा असून धरण 60.91% टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात 0.44 टीएमसी पाणीसाठा धरणात झाला आहे. धरणातील आवक ही कमी झाली असून सध्या 7 हजार 216 क्युसेक आवक सुरू आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून अजूनही 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षी आजच्या दिवशी धरणात 90.68 टीएमसी पाणीसाठा होता तर धरण 86.15% भरले होते.
सातारा जिल्ह्यात आज मोठे प्रकल्प असणाऱ्या कोयना, धोम,धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या प्रकल्पा क्षेत्रात 0 पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मध्यम प्रकल्प असणाऱ्या क्षेत्रात येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा, उत्तरमांड, कुडाळी महू, कुडाळी हातगेघर, वांग मराठवाडी परिसरात ही 0 पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना 2100, धोम बलकवडी 714, कण्हेर 24, उरमोडी 200, तारळी 609, मोरणा 504, उत्तरमांड 92, कुडाळीमू 100 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
गतवर्षी कोयना-कृष्णेला आलेला पूर काहीसा आजच्या दिवशी ओसरला होता. सलग चार दिवस कराडला प्रतिसंगम बाग पाण्याखाली होती. आजच्या दिवशी बागेतील पाणी ओसरले होते.मात्र पूराचे पाणी कृष्णा घाटावर स्थिर होते.



Comments
Post a Comment