कराड शहराच्या सर्वागिण विकासासाठी शासन कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
कराड शहराच्या सर्वागिण विकासासाठी शासन कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
कराड दि.27-कराड शहराच्या विविध विकास योजनांवर चर्चा करण्यासाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी सुधीर एकांडे, सचिन पाटील, पवन निकम, प्रदिप साळुंखे, शरद कणसे, राम रेपाळे उपस्थित होते.
राजेंद्रसिंह यादव यांनी आपल्या सत्तेतील गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची माहीती ना.शिंदे यांनी दिली. विशेषत स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सातत्याने देश पातळीवर झालेल्या गौरवाबाबत आनंद व्यक्त करुन कराड नगर परिषदेने योग्य नियोजनाने केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.यावेळी यादव यांनी कराड शहराच्या नियोजित विकास कामांची सविस्तर माहीती मुख्यमंत्र्यांना दिली. ना. शिंदे यांनीही लक्षपुर्वक समजून घेवून काही उपयुक्त सुचना देत कराड शहराच्या विकास कामात शासन तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहील याची ग्वाही दिली.
यावेळी राजेंद्रसिह यादव यांनी त्यांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल यथोचित सत्कार करुन कराडला भेट देण्याची विनंती केली.त्यांनी ही कराडला येण्याचे मान्य केले असुन लवकरच ते सातारा जिल्हा दौर्यावर येणार असल्याचे यादव समर्थकांनी सांगितले.


Comments
Post a Comment